आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भव्य कटआऊट उभारून कंपनीची कामगारांप्रति कृतज्ञता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पन्नाशीची वाटचाल करणार्‍या सीटीआर कंपनीने यशाचे श्रेय कामगारांची निष्ठा आणि श्रमाला देऊन आगळा ऋणनिर्देश सोहळा साजरा केला. कामगारांनाच ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करून कंपनीने अजंटा अ‍ॅम्बेसेडर हॉटेलमध्ये त्यांना कुटुंबीयांसह पार्टी दिली. एवढेच नाही तर हॉटेलच्या प्रवेशद्वारावर भव्य कटआऊट्स उभारून कामगारांची छायाचित्रे लावली. निवृत्त झालेल्या कंपनी सोडून गेलेल्या कर्मचार्‍यांचाही गौरव केला. शहरातील औद्योगिक क्षेत्राला सकारात्मक संदेश देणारी ही घटना ठरली.

चिकलठाणा परिसरातील सीटीआर कंपनीने १९६५ ते २०१५ अशी ५० वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. त्यानिमित्त हॉटेल अजंटा अँम्बेसेडरमध्ये कामगार, कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांसाठी खास पार्टी ठेवण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी भव्य कटआऊटवर कामगारांची भली मोठी छायाचित्रे लावण्यात आली होती. कंपनीचे दोन कारखाने असून, कॅपेसेटर टॅब चेंजरचे उत्पादन आहे. वीजनिर्मितीसाठी लागणार्‍या सामग्रीत हे भाग वापरले जातात. भारतासह ३५ देशांत उत्पादनाची निर्यात होते. कंपनीत ५०० कर्मचारी आहेत.

कामगारांमुळेच...
१०ते ४० वर्षे सेवा देणारे अनेक हात कंपनीत आहेत. त्यांच्यामुळेच ही वाटचाल केली. त्यांना हा मानाचा मुजरा केला आहे. अनिलकुमार, एमडी, सीटीआर ग्रुप

निवृत्तांचाही सन्मान
निवृत्तकंपनी सोडून गेलेले कर्मचारी सोहळ्यात निमंत्रित होते. कंपनीचे एमडी अनिलकुमार प्राजक्ता कुमार दोघे फिरून आग्रहाने विचारपूस करत होते.

कुटुंबीयांना शाही पार्टी : दहावर्षांहून अधिक काळ सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कटआऊटवर त्यांची छायाचित्रे लावण्यात आली. अजंटा अ‍ॅम्बेसेडर ह़ॉटेलात त्यांना सहकुटुंब स्नेहभोजन दिले. या वेळी चित्रपट तारकांचा नृत्य कार्यक्रम झाला.