आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तडीपार गुन्हेगाराने पाेलिस ठाण्यात उधळल्या नोटा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एका तडीपार गुंडाने दारूच्या नशेत पोलिस चौकीत शंभर आणि पाचशेच्या नोटा उधळत घाटीतील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. हा प्रकार पाहून पोलिस आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण या घटनेचा पोलिस प्रशासनाने इन्कार केला आहे. त्याचे असे झाले, ३५ वर्षांचा संताेष राजपूत नावाचा तरुण रात्री वाजता घाटीत नातेवाईकाला भेटण्यास आला होता. पण त्याला कर्मचाऱ्यांनी चांगली वागणूक दिली नाही म्हणून तो पोलिस चौकीत गेला.
मी तडीपार गुंड असून माझ्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. माझे कोणीच काही करू शकत नाही. माझ्या नादी कोणी लागेल तर याद राखा, अशी धमकीही तो देत होता. शेवटी कर्मचाऱ्यांनी त्याला बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात कुठल्याही गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली नाही. पोलिस निरीक्षक सलीम शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.
पुढे वाचा.. मुंडेंच्या कारची धडक दुचाकीस्वार जखमी
बातम्या आणखी आहेत...