आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैं हूं डॉन’वर थिरकले कैदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मैं हूं डॉन, नायक नहीं खलनायक हूं मैं, चढता सूरज धीरे धीरे, तारीफ तेरी निकली है दिलसे आयी है लब पे बनके कव्वाली शिर्डीवाले साईबाबा आणि मुंगळा मुंगळा यासह विविध गाण्यांवर शनिवारी (2 नोव्हेंबर) हर्सुल कारागृहातील कैद्यांनी नृत्य केले. सकल मारवाडी समाज महासभा आणि सारा बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कैद्यांसाठी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदी- मराठी चित्रपटांमधील लोकप्रिय गाण्यांवर कैद्यांनी बहारदार नृत्य केले. ‘क्या जमाना था’ ग्रुपच्या शीतल रुद्रावार यांच्या चमूने नाना पाटेकर यांच्या ‘अंकुश’ चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ आणि ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगाने कारागृहातील कैदी भारावून गेले. यानंतर ‘कर्मा’ चित्रपटातील हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए या गाण्याला कैद्यांनी भरभरून दाद दिली. हसरूल कारागृहात शिक्षा भोगणारा कैदी अब्दुल रहेमान हाश्मी याने ‘चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा’ ही कव्वाली सादर केली. गंगाप्रसाद गायकवाड या कैद्याने चित्रपट अभिनेते नाना पाटेकर, सनी देओल, राजकुमार, अमरीश पुरी, निळू फुले, गुलशन ग्रोवर यांची मिमिक्री करून सर्वांनाच खळखळून हसवले. कैदी मुक्ताराम शिंदेने तीन शेर सादर करत ‘महाराष्ट्राचे दोन राजे एक त्या रायगडावर एक त्या चवदार कड्यावर’ हे गीत सादर केले.

कारागृह अधीक्षक विनोद शेकदार, सकल मारवाडी समाज महासभेचे कार्याध्यक्ष महावीर पाटणी आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

अनेक दिवसांची इच्छा झाली पूर्ण
कैद्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशी फार दिवसांची इच्छा होती. नागपूरमध्येदेखील असे आयोजन केले जाते. दोन दिवसांपूर्वी सकल मारवाडी समाज महासभेच्या पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमाची परवानगी मागितली. त्यासाठी आम्ही होकार दिला. त्यामुळे कैद्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. विनोद शेकदार, कारागृह अधीक्षक