आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुशन गोदामाची आग विझविताना मनपा फायर ब्रिगेडची अग्निपरीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पऔरंगाबाद - जुन्या औरंगाबादमधील नवाबपुरा भागातील घरातच थाटलेल्या कुशनच्या गोदामाला लागलेली आग विझविताना स्थानिक नागरिक आणि मनपाच्या अग्निशमन दलाची मंगळवारी अग्निपरीक्षा झाली. दाट वस्ती आणि अरुंद रस्त्यांमुळे घटनास्थळापर्यंत बंब पोहोचण्यात अडचण आल्याने वेळेवर मदत पोहोचू शकल्याने गोदामाशेजारील तीन घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
सय्यद यांचे सेंट्रल नाका परिसरात कुशन सीट कव्हरचे दुकान आहे. त्यांनी आपल्या नवाबपुऱ्यातील घरातच गोदाम तयार केले होते. या गोदामात आठ ते दहा जण काम करत होते. दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. गोदामातील फोमने पेट घेतल्यानंतर पाहता-पाहता आगीने शेजारी किरायाने राहणाऱ्या अकबर काजी, तारेक कुरेशी यांच्यासह अन्य एका घराला विळखा घातला. या वेळी तिन्ही कुटुंबीयांनी तेथून सुरक्षित ठिकाण गाठले. आगीचे रौद्ररूप पाहून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. बघ्यांची गर्दी झाल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आगीचे लोळ शहराच्या कानाकोपऱ्यातून पाहायला मिळत होते. या भागातील अरुंद रस्ते, एकाला एक लागून असलेली घरे, अवघ्या आठ ते दहा फुटांची गल्ली यामुळे अग्निशमन बंब पोहोचण्यास अडचण निर्माण झाली. ताेपर्यंत राजाबाजार आणि नवाबपुऱ्यातील तरुणांनी आजूबाजूच्या घरातील पाण्याचा वापर करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग लागलेल्या इमारतीपर्यंत पोहोचणे अवघड होते. त्यामुळे आग नेमकी कोठून विझवावी हे कळत नव्हते. शिवाय अग्निशमन बंब घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नव्हता. त्यामुळे लांब पाइप जोडून घटनास्थळापर्यंत नेण्यात आले. टँकरमधील पाणी अग्निशमन बंबात ओतले जात होते. तब्बल २५ पेक्षा अधिक टँकर्स पाणी आग आटोक्यात आणण्यासाठी वापरले गेले. अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग अाटोक्यात आली. मात्र तोपर्यंत तीन घरांची राखरांगोळी झाली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर बातमी...
बातम्या आणखी आहेत...