आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साजिद पाशा हल्ला प्रकरणात तिघांना कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, आझाद अली एज्युकेशन ट्रस्टचे सर्वेसर्वा खान साजिद पाशा सलिमोद्दीन खान (४१) त्यांच्या आई सुरय्या सलीम खान (६१, रा. खडकेश्वर) यांच्यावर जागेच्या वादातून सात जणांनी शुक्रवारी (२२ एप्रिल) सकाळी जीवघेणा हल्ला केला हाेता. या प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून दोन आरोपींचा अजूनही शोध लागला नाही. हल्ला प्रकरणातील सातपैकी एक आरोपी अब्दुल हमीद खान नवाब खान याला न्यू एसटी कॉलनी येथून शुक्रवारी रात्रीच पोलिसांनी अटक केली होती.
सोमवारी (२५ एप्रिल) जुनेद खान, जाहेद खान या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दरम्यान, जावेद खान, ताहेर खान या दोन आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. तसेच सरदार यार खान, मेहराजोद्दीन सिद्दिकी या दोघांना अंतरिम जामीन मिळाला आहे. या हल्ल्यात साजिद पाशा यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. डोक्याला १९ टाके पडले होते. तर त्यांच्या आईचा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता.
बातम्या आणखी आहेत...