आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कस्टम ड्यूटी चुकवणार्‍याला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सेवाकराचा भरणा न करणार्‍या शेख रफिक अहमद या व्यावसायिकाला केंद्रीय सीमाशुल्क आणि सेवाकर विभागाने मंगळवारी अटक केली. रेल्वेस्टेशन येथील परफेक्ट एक्स्प्रेस कार्गाे सर्व्हिसचे मालक शेख रफिक यांनी आपल्या अशिलाकडून सेवाकराचा भरणा करण्यासाठी 70 लाख रुपये आगाऊ म्हणून घेतले. एकूण 84 लाख 76 हजार रुपयांची कस्टम ड्यूटी असून त्याने घेतलेले पैसे सरकारी तिजोरीत जमा केले नाहीत. विभागाने वारंवार सांगूनही उद्योजकाने दुर्लक्ष केले. त्यामुळे केंद्रीय सीमाशुल्क आणि सेवाकर आयुक्तालयाच्या कलम 91 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला अटक करून सिडको एन-7 येथील पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले आहे. आयुक्त कुमार संतोष यांनी दिलेल्या माहितीनुसार सेवाकर कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेला पहिलाच उद्योजक आहे. विभागांतर्गत येणारे सर्व व्यावसायिक आणि उद्योजकांनी सेवाकराचा वेळीच भरणा करण्याचे आवाहनही कुमार संतोष यांनी केले.