आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cutting Of 170 Crores For Development Work In 113 Wards

११३ वॉर्डांतील १७० कोटी रुपयांच्या कामांना कात्री, मंजूर केलेली नगरसेवकांची कामे रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराच्या विकासासाठी स्थायी समितीने अंदाजपत्रकात १३० कोटी रुपये तर सर्वसाधारण सभेने त्यात आणखी ४० कोटी रुपयांचा समावेश केला होता. मात्र प्रशासनाने ११३ वॉर्डांतील १७० कोटी रुपयांच्या विकासकामांना कात्री लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा प्रकार गंभीर असल्याने सात जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटतील, अशी चर्चा मनपात होत आहे.

प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतर प्रशासकीय कामांसाठी ७९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्याला सर्वसाधारण सभेने मंजुरीही दिली होती. त्यात शहरातील विकासकामांचा समावेश नसल्याने स्थायी समिती सभापती दिलीप थोरातांसह समिती सदस्यांनी नगरसेवकांच्या वॉर्डात कामे करण्यासाठी १२० कोटी रुपयांनी अंदाजपत्रक फुगवले. तसेच विविध प्रशासकीय प्रशिक्षणासाठी अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे दहा कोटी रुपयांची तरतूद करून अंदाजपत्रकात १३० कोटी रुपयांचा समावेश केला होता. तसेच सर्वसाधारण सभेत महापौर त्र्यंबक तुपे यांनी वॉर्डातील विकासकामांसाठी आणखी ४० कोटी रुपयांचा यात समावेश केला होता.
पुढे वाचा... महसूल मिळणार नसल्याने कामे रद्द
... यापूर्वीही झाली होती बैठक