आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तालयातील सायबर सेल चोरांना पकडण्यात अपयशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित आहेत, असा आपला समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण या पैशावर सायबर चोर कधी डल्ला मारतील हे सांगता येत नाही. ही चोरी तुमच्या डोळ्यासमोर होते. ती करण्यासाठी तुमचाही आधार घेतला जातो. मात्र, तुम्ही काहीही करू शकत नाही.

विशेष म्हणजे, शहरातील सायबर सेलदेखील या चोरांना पकडण्यासाठी सक्षम नाही. ऑनलाइन गंडा घालण्याचे महिन्यात चारपेक्षा अधिक प्रकार घडतात. शहरात किमान चार जणांचे मोबाइल रोज चोरीला जातात. सगळे पुरावे देऊनही या चोरांना पकडण्यात सायबर सेलला यश मिळत नाही. विशेष म्हणजे नागरिक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संबंधित पोलिस निरीक्षकांना फोन करतात, पण तो फोन उचलण्यासाठीदेखील त्यांना वेळ नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
ऑनलाइनपद्धतीने लांबवले लाख १० हजार रुपये :आयसीआयसीआयबँकेचा मॅनेजर बोलतो म्हणत तुमचे खाते दुसऱ्या खात्यासोबत लिंक झाले असून तुमच्या एटीएम कार्डची संपूर्ण माहिती सांगा, असा फोन चेतनानगरातील रहिवासी प्रसाद वैद्य (३४) यांना तीन एप्रिल रोजी आला. हा फोन त्यांना ७५६२००६६२५ या मोबाइलवरून आला होता. त्याने आपले नाव सूरजकुमार असल्याचे सांगून आयसीआयसीअाय बँकेत मॅनेजर असल्याचे सांगितले होते. या भामट्याने वैद्य यांचा विश्वास संपादन करून त्यांची संपूर्ण माहिती घेतली आणि त्यांच्या खात्यातील सुमारे लाख १० हजार रुपये चोरले. वैद्य यांच्या फिर्यादीवरून सूरजकुमार नामक भामट्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

क्रेडिटकार्डची माहिती विचारून 4 हजार लांबवले : उस्मानपुऱ्यातील विवेकानंद नगरातील प्रसन्न जोशी (४२) यांना शुक्रवार, 1 मे रोजी रात्री च्या सुमारास फोन आला क्रेडिट कार्डवर जमा असलेले रिवॉर्ड पॉइंट रेटिंग करण्यास सांगितले. तसे केले नाही तर तुमचे रिवॉर्ड पॉइंट्स लॅप्स होतील, असे सांगण्यात आले. हे ऐकल्यानंतर जोशी यांनी आपल्या क्रेडिट कार्डची सर्व माहिती या भामट्याला दिली. माहिती घेऊन भामट्याने जोशी यांना थोड्या वेळाने एक मेसेज येईल, त्यात तुमच्या खात्यात 4 हजार ९७१ रुपये जमा होतील, असे सांगितले. परंतु काही वेळाने जोशी यांच्या खात्यातील हजार ९७१ रुपये काढून घेण्यात आल्याचा मेसेज आला. हा मेसेज वाचताच जोशी यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात त्या अज्ञात भामट्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिस हवालदार जाधव तपास करीत आहेत.
कारच्या आमिषाने ३४ हजारांना गंडवले
२५ एप्रिलला सहारा चॅनलवर "चेहरा पहचानो' कार्यक्रमात चेहरा ओळखा, बक्षीस मिळवा, असे जाहीर केले होते. अमित कच्छ वाहने फोटाे ओळखून दिलेल्या नंबरवर एसएमएस केला. पहिल्या ५०० विजेत्यांना बक्षीस मिळेल, असे या शोचा अँकर सांगत होता. काही वेळाने अमितला फोन आला आणि आपण १२ लाखांचे बक्षीस जिंकले आहे, असे सांगण्यात आले. तुम्हाला ही रक्कम रोख हवी की त्या बदल्यात १२ लाखांची कार हवी? असे विचारल्यानंतर अमितने कारचा पर्याय निवडला. त्यानंतर वेगवेगळ्या चार नंबरवरून त्याला सतत फोन येत गेले. बक्षिसाचे आमिष दाखवून अमितला ३४ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. सगळे नंबर सायबर शाखेकडे देऊनही कुठलीही हालचाल केली नाही, अशी फिर्यादीची तक्रार आहे.

काय घ्यायला हवी काळजी ?
- बँक प्रतिनिधीच्या नावाने कोणीही फोन केल्यास त्याला आपल्या एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये.
- कोणत्याही बँकेचे प्रतिनिधी खात्याची माहिती विचारण्यासाठी फोन करत नाहीत हे लक्षात घ्यावे.
- आपला एटीएम कार्डचा पासवर्ड कोणालाही देऊ नये.
- ऑनलाइन व्यवहार करताना अकाउंट हॅक करू नये यासाठी काळजी घ्यावी.
- शंका आल्यास पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा बँकेशी संपर्क साधून खात्यावरील सर्व व्यवहार थांबवावेत.

पुरावे देऊनही आरोपी सापडेना
सायबर चोर औरंगाबादकरांना लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत. एखाद्या चेनस्नॅचिंग आणि घरफोडीपेक्षा कितीतरी पटीने मोठा हा दरोड्याचा प्रकार आहे. मात्र, पोलिस ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. ज्या अकाउंटमध्ये हे पैसे गेले आहेत, ज्या नंबरवरून फोन आले आहेत, असे सगळे पुरावे फिर्यादी सायबर सेलकडे देतात. मात्र, याबाबत कुठलीही चौकशी होताना दिसत नाही. मोबाइल चोरीदेखील पोलिस गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. तसा अनुभवही फिर्यादी सुनील कच्छवाह यांना आला आहे.
बातम्या आणखी आहेत...