आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रम आता प्रत्येक शाखेत सक्तीचा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशभरात माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणार्‍या समस्यांवर उपाय म्हणून यूजीसीने सायबर सिक्युरिटी कोर्स अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत केवळ मॅनेजमेंट कोर्स असणारा हा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीई आणि यूजीसीने सर्व टेक्निकल इन्स्टिट्यूट, विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या सायबर मॅनेजमेंट कोर्समध्ये सायबर सिक्युरिटी, इन्फॉर्मेशन अँड सायबर वारफेअर, बायोमॅट्रिक्स अँड सायबर सिक्युरिटी, सायबर फॉरेन्सिक अँड इन्फर्मेशन सिक्युरिटी आदी विषयांचा समावेश आहे. हा कोर्स सुरू करण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राइम आणि सायबर सिक्युरिटीविषयी माहिती व्हावी हा आहे.

विद्यापीठातील विविध समित्या त्याबाबत निर्णय घेतात. मॅनेजमेंट कौन्सिल, बोर्ड ऑफ स्टडीज, सिनेट मेंबर्स आदींच्या परवानगीने बैठकीत नवीन विषयांचे निर्णय घेतले जातात.
डॉ. उल्हास शिऊरकर, प्राचार्य, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय

आगामी काळात इंटरनेटचा वापर आणखी झपाट्याने वाढणार आहे.त्यामुळे सायबर क्राइम, फायनान्शियल क्राइम, आयडेंटिटीसंबंधीचे गुन्हे आदींसाठी या विषयाची गरज भासणार आहे.
प्रशांत देशपांडे, तज्ज्ञ

सायबर सिक्युरिटी कोर्समुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित इंटरनेट हाताळणी कळेल. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल. अभ्यासक्रमातच जर सायबर सिक्युरिटीसारखे विषय आले तर विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची जाणीव होईल. प्रा.राधाकृष्ण नाईक, एमआयटी संगणकशास्त्र विभाग