आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cycle Mart Is Nominal At Sillod, Aurangabad District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायकल मार्ट उरले नावापुरते !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळदरी: सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे एकेकाळी मोठय़ा प्रमाणात चालणारा सायकल भाड्याने देण्याचा व्यवसाय आज नामशेष होण्याचा मार्गावर आहे.
खेड्यातील आर्थिक सुबत्ता वाढल्याने आता ग्रामीण भागात भाड्याच्या सायकल घेऊन काम करणे व काम संपले की, सायकल जमा करण्याचा हा व्यवसाय शेवटची घटका मोजत आहे. गावात आता सायकलची जागा मोटारसायकलींनी घेतली आहे. त्यामुळे सायकलवर बसणेही गैरसोयीचे व अप्रतिष्ठेचे वाटत आहे. काही प्रमाणात दुचाकी वाहनांची खरेदी केवळ प्रतिष्ठेसाठी होऊ लागली आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम झाला तो सायकल भाड्याने देण्यार्‍या व्यापार्‍यांचे नुकसान होत आहे.
गावातील लहान मुलांना घर ते शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी जाण्यासाठी स्वस्त व किफायतशीर होते. लहान सायकली मोठय़ा प्रमाणात भाड्याने देणार्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. सायकल 1 रुपया ते 5 रुपये प्रतितास मिळत होती. यातून मार्टचालकांना चांगला आर्थिक फायदा मिळायचा; परंतु सध्या या व्यावसायला पूर्णपणे घरघर लागली आहे. सध्या घरोघरी दुचाकी वाहने दिसत आहेत. इंधनाचे दर कितीही वाढले, तरी प्रत्येक जण दुचाकी वापरण पसंत करत आहे. सध्या सायकल वापरणार्‍यांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईन सायकल दुरुस्ती करणारे गावात दिसतात. हवा भरणे आणि पंक्चर काढणे याशिवाय दुसरे काम राहिले नाही.
> पूर्वी गावांमध्ये सायकल भाड्याने मिळायची; पण आता एकही सायकल भाड्याने मिळत नाही. त्यामुळे मार्ट व्यावसाय पूर्ण नामशेष झाला आहे. काहीजण सायकलची दुरुस्ती करून उपजीविका भागवतात. गजानन गव्हांडे, सायकल दुरुस्ती दुकानदार, पिंपळदरी