आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cylinder Waiting Up To 25 Thousand In Aurangabad

सिलिंडरचे वेटिंग 25 हजारांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ऐन सणासुदीत गॅस वितरण कंपनीने टँकरचालकांचे प्रशिक्षण घेतल्याने शहरातील गॅस सिलिंडरची प्रतीक्षा यादी 25 हजारांनी वाढली आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत असून पाच दिवसांचा सिलिंडरचा अनुशेष भरून निघेपर्यंत किमान दहा ते बारा दिवस ग्राहकांना त्रास सहन करावा लागेल.

प्लँटपासून एजन्सीपर्यंत सिलिंडर सुरक्षितरीत्या आणि वेळेत पोहोचावेत यासाठी मागील आठवड्यात हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांतर्फे टँकरचालकांचे चार दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले. बहुतेक चालक या प्रशिक्षणात गुंतल्याने प्लँटवर गाड्या भरलेल्या असूनही त्या शहरात येऊ शकल्या नाहीत. शहराला दररोज 15 ते 18 हजार सिलिंडरची गरज आहे. मात्र, प्रशिक्षणामुळे शहरात केवळ 10 हजार सिलिंडर पोहोचत होते. त्यामुळे चार दिवसांत ग्राहकांची प्रतीक्षा यादी 25 हजारांवर गेली. प्रशिक्षण संपले असून पुढील चार-पाच दिवसांत अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात येणार आहे.

अनुशेष भरून काढू
सिलिंडर सुरक्षित पोहोचवण्यासाठी चालकांना प्रशिक्षण देणे आवश्यक होते. त्यामुळे सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असला तरी हा अनुशेष चार-पाच दिवसांत भरून काढण्याचा प्रयत्न करू. चंद्रप्रताप राजावत, विभागीय विक्री अधिकारी, भारत पेट्रोलियम.

पाच दिवसांचे वेटिंग
नवरात्रोत्सवात आणि विजयादशमीच्या तोंडावर टँकरचालकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. त्यामुळे एजन्सीवर पाच दिवसांचे वेटिंग वाढले आहे. शफिक खान, संचालक, अंबर गॅस एजन्सी.

सध्या प्रतीक्षा यादी अडीच हजारांवर
कंपनीकडून टँकरचालकांचे प्रशिक्षण घेतले जात असल्याने एजन्सीवर सिलिंडरचा पुरवठा होत नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादी दोन ते अडीच हजारांनी वाढली आहे. मंगेश आस्वार, संचालक, मंगेश गॅस एजन्सी.