आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dagadi Chaal Not Arun Gavali's, But Love Story Actor Ankush Chaudhari

'दगडी चाळ' अरुण गवळीची नव्हे, प्रेमाची कहाणी - अभिनेता अंकुश चौधरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दगडी चाळ' चित्रपटातील अभिनेता अंकुश चौधरी, पूजा सावंत आणि संगीतकार अमितराज यांनी शनिवारी 'दिव्य मराठी' कार्यालयास भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी गप्पा मारल्या.
छाया : दिव्य मराठी
औरंगाबाद - कुख्यात गुंड अरुण गवळीच्या जीवनाशी साधर्म्य साधणारा चित्रपट म्हणून 'दगडी चाळ' या चित्रपटाची चर्चा होत असली तरी ही एक प्रेमकहाणी आहे. कुठलीही व्यक्ती परिस्थिती, संस्कारातून घडते, असा संदेश आम्ही दिला आहे. १९९६ च्या काळातील एक सुंदर प्रेमकहाणी आम्ही यातून प्रेक्षकांसमोर आणत आहोत. चित्रपट मारधाड, गुंडगिरीशी संबंधित असला तरीही बाहेर पडणारा प्रेक्षक कुठलीही नकारात्मक गोष्ट मनात घेऊन बाहेर पडणार नाही याकडे आम्ही लक्ष दिले आहे, असे अभिनेता अंकुश चौधरी यांनी सांगितले.

ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'दगडी चाळ' चित्रपटाच्या प्रचारासाठी टीमने "दिव्य मराठी' कार्यालयाला भेट दिली. या वेळी अभिनेत्री पूजा सावंत आणि संगीतकार अमितराज यांची उपस्थिती होती. अंकुश म्हणाले, चाळीत राहणाऱ्या सूर्या नावाच्या मुलाची भूमिका मी साकारत आहे. सुरक्षित टीमसोबत काम करणे मला कधीच मान्य नाही. कारण त्यामुळे आपली
कल्पकता संपते असे माझे मत आहे. त्यामुळे मी या चित्रपटात नव्या टीमसोबत आहे. मकरंद देशपांडे जेव्हा पहिल्यांदा गेटअपमध्ये आमच्यासमोर आले तेव्हा डॅडी (अरुण गवळी) हेच असू शकतात, अशी सर्वांचीच प्रतिक्रिया होती.


गाण्यांना प्रेक्षकांची पसंती
पूजा म्हणाली, माझी व्यक्तिरेखा चाळीत राहणाऱ्या सोनल नावाच्या मुलीची आहे. सूर्या आणि सोनलची ही प्रेमकहाणी आहे. अमितराज म्हणाले की, चित्रपटाचे संगीत दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहील. मोरया हे गाणे सध्या लोकप्रिय होत आहे. गाण्याचे शब्द आाणि चित्रीकरणाचा त्याच्या हिट होण्याशी जवळचा संबंध आहे. या चित्रपटातील दोन्ही गाण्यांत ते अचूक साधले गेले आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांना हे अचूक जमले आहे.