आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहसी क्रीडा प्रकारात समावेशासाठी टप्पे करावे लागतील पार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दहीहंडीअथवा कुठल्याही खेळाचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करायचा असेल तर विविध पाच अडचणींचे ‘थर’ सर करावे लागतील. योग्य नियोजन, अभ्यास आणि नियमानुसार काम केले तर दहीहंडीचा साहसी क्रीडा प्रकारात सहज समावेश होऊ शकतो. मात्र, त्यापूर्वी सर्व बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे, असे क्रीडातज्ज्ञ तथा क्रीडा उपसंचालक माणिक ठोसरे यांनी सांगितले. गोविंदा पथक आिण आयोजकांनी खेळात समावेशाची मागणी केली आहे.
१. कोणताही नवीन खेळ निर्माण करण्यापूर्वी अभ्यास समितीतर्फे सहभागी होणाऱ्या खेळाडू, वय, वजन, मैदान, नियम आदी महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करून त्याला आकृतिबंध स्वरूप देते.

२. दहीहंडी खेळाची राज्य, विभाग, जिल्हा अशा प्रकारची अधिकृत संघटना असणे आवश्यक आहे. त्या संघटनेकडून खेळाचा प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे. जिल्हा, राज्य स्पर्धांचे आयोजन अपेक्षित असते.

३. संघटनेने त्या खेळाचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे आणि महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेकडे सादर करावा लागतो.

४. साहसी क्रीडा प्रकारात समाविष्ट केला जाणारा खेळ हा वदि्यार्थी, खेळाडूंच्या फायद्याचा आहे की नाही याचा अभ्यास शासनाने नेमलेले तज्ज्ञ करतात. त्यानंतर मान्यता देण्यात येते. त्यात त्रुटी असल्यास त्या दुरुस्त कराव्या लागतात. शासन आणि एमओएची मान्यता असल्याशिवाय तो खेळ अधिकृत होऊ शकत नाही.

५. क्रीडा मंत्रालय त्या खेळाला अधिकृतरीत्या मान्यता देते. देवगिरी महावदि्यालयाचे एनसीसी कॅडेट्स दहीहंडीचा सराव करताना.