आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहीहंडीचा निधी शहिदाच्या कुटुंबाला; मनसेचा कौतुकास्पद निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दहीहंडीचा महोत्सव रद्द करून जमा झालेला निधी पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेल्या कोल्हापूर येथील जवानाच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे, अशी माहिती संजोग बडवे आणि नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मनसेतर्फे निरालाबाजार येथे राजयोग दहीहंडी महोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी जमा होणार्‍या निधीतून एड्सग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गुणवतांना मदत केली जाते. मात्र, यावर्षी कोल्हापूर येथील शहीद जवान कुंडलिक माने यांच्या कुटुंबीयांना मदतनिधी देण्याचा निर्णय झाला. याशिवाय कोकणवाडीतील शाखाप्रमुख मुकेश सोनवणे यांच्या वडिलांचे अचानक निधन झाल्याने त्यांना या रकमेपैकी 21 हजार रुपये बुधवारी देण्यात येतील, असे सांगण्यात आले. या वेळी संजय फत्तेलष्कर, अनिल लहाने, अमोल खडसे, विशाल आहेर, सचिन हिरे, चंदन कुलकर्णी, राहुल सोनवणे यांची उपस्थिती होती.