आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेशाचे उल्लंघन करून आवाज चढवणाऱ्या पथकांची चौकशी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दहीहंडीमहोत्सवाच्या आयोजकांनी सोमवारी (१८ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत ध्वनिक्षेपकाचा आवाज ६५ डेसिबल्सपेक्षा अधिक चढवला. त्याची चौकशी पोलिस आयुक्त राजेंद्रसिंग यांनी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात तीन आयोजकांनी आदेश मोडीत काढल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यावर येत्या दोन दविसांत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्व संबंधित पोलिस ठाण्यांनी इतर आयोजकांच्या आवाजाची नोंदणी केलेली नाही, असेही स्पष्ट झाले आहे.
थरांचा थरार उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिल्यामुळे सोमवारी सर्वत्र दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. ध्वनिक्षेपकाची मर्यादा जवळपास सर्वांनीच ओलांडली. "दवि्य मराठी'ने यासंदर्भात वृत्त प्रसदि्ध केले आहे. सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांच्या खेरीज इतर ठाण्यांनी डेसिबल्स मोजले नसल्याची माहिती पुढे आली आहे. सिटी चौक ठाण्यांतर्गत नऊ दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी सहा दहीहंड्या दुपारीच आटोपल्या होत्या. तीन दहीहंड्यांचा उत्सव रात्री दहापर्यंत सुरू होता. त्यांनी ६५ डेसिबल्सची मर्यादा लांडल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यासंदर्भात पोलिस उपायुक्त (परिमंडळ-१) यांच्याकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. येत्या दोन दविसांत त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. जिन्सी ठाण्यांतर्गत चार दहीहंड्या होत्या, त्यांनीही लवकरच आटोपल्यामुळे डेसिबल्स मोजण्यात आले नव्हते. छावणी येथे दहा दहीहंडी आयोजकांनी शांततेत उत्सव साजरा केला आहे. क्रांती चौक ठाण्यांतर्गत दोन मोठ्या दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी मात्र ६५ डेसिबल्सपेक्षा अधिक आवाज केला नसल्याचे पोलिस निरिक्षकांनी म्हटले आहे.
कारवाई होणारच
स्वाभिमानक्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद राठोड यांनी आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. ६५ डेसिबल्सपेक्षा अधिक आवाज केला नाही, असा दावा केला. राजयोग महोत्सवाचे अध्यक्ष राजगौरव वानखेडे यांनीही सर्वच आयोजकांनी िनयमाचे पालन केल्याचे सांिगतले. ज्या आयोजकांनी १२ वर्षांखालील गोविंदांचा वापर केला. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्त राजेंद्र िसंह यांनी सांिगतले.