आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daily Bhaskar Junior Editor Competation Result Declared

‘दैनिक भास्कर’च्या ज्युनियर एडिटर स्पर्धेत राज्यातील चौघात औरंगाबादची कोमल यशस्वी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दैनिक भास्कर समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या ज्युनियर एडिटर स्पर्धेत महाराष्‍ट्रातील चार विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. औरंगाबादची कोमल नानासाहेब रोठे, सोलापूरची केतकी यशवंत कुलकर्णी, भुसावळची राजेश्वरी गिरीश नेहते व नाशिकचा सूरज मंगेश परदेशी यांचा त्यात समावेश आहे. औरंगाबादची कोमल ही विवेकानंद महाविद्यालयातील 12 वीची विद्यार्थिनी आहे. ‘दिव्य मराठी’ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, बक्षीस आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.


दैनिक भास्कर समूहातर्फे विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ होण्यासाठी संपूर्ण देशभरात ज्युनियर एडिटर ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये देशभरातून सुमारे तीन लाख 12 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात महाराष्‍ट्रातून चार विद्यार्थी यशस्वी ठरले. औरंगाबादची कोमल रोठे ही विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून ती बारावीत शिकते. कोमल अभ्यासासोबतच खो-खोची खेळाडू आहे. तिचे वडील बजाज कंपनीत नोकरीस आहेत. भविष्यात पोलिस निरीक्षक होण्याचे स्वप्न तिने बोलून दाखवले.


सोलापूरची केतकी इंडियन मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी आहे. राजेश्वरी नेहते भुसावळच्या बियाणी प्राथमिक विद्या मंदिर तर सूरज परदेशी नाशिकच्या नवजीवन इंग्लिश स्कूलमध्ये शिकतो. भविष्यात इंजिनिअर होण्याचे त्याचे स्वप्न आहे.