आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम पाऊसपाणी, कर्जमाफी दृष्टिपथात, तरी दिवसाकाठी दोन शेतकरी आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- यंदा मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी दृष्टिपथात आहे. असे असतानाही शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र मात्र थांबलेले नाही. यंदा सरलेल्या १० महिन्यांत मराठवाड्यातील ८१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात झाली आहे. याच  काळात विदर्भात ११३३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. एक जानेवारी ते १२ नोव्हेंबर या काळात दररोज दोन ते तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात  बीड जिल्ह्यातील सर्वाधिक १६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या  केल्या आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. चांगला पाऊसपाणी आणि कर्जमाफी  होऊनही कृषी माल उत्पादन व खर्चाचा मेळ बसत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत असे सध्याचे चित्र आहे. सोयाबीन आणि कापसाच्या घसरलेल्या किमतीने मराठवाड्यातील शेतीचे आर्थिक गणितच बिघडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.  


यंदा जून ते ऑक्टोबर या काळात जुलै वगळता मराठवाड्यात परभणी आणि नांदेड वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांत वार्षिक सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. विशेष म्हणजे सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तर १०० टक्क्यांहून जास्त पाऊस झाला आहे. असे असले बीड जिल्ह्यातील १६७, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १०५ शेतकऱ्यांनी यंदा आत्महत्या केल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या असून त्याखालोखाल या वर्षी तुलनेने पाऊसमान कमी झालेल्या नांदेड  जिल्ह्यातील १२७ शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या आहेत. 

 

उत्पादन-खर्चाचा मेळ बसेना

सोयाबीनसाठी क्विंटलमागे ३०५० रुपये आधारभूत किंमत जाहीर आहे. सध्या सोयाबीनला दर्जानुसार २००० ते २७०० रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. सोयाबीनचा सरासरी उत्पादन खर्च एकरी ४००० रुपये येतो. कापसाला सध्या ३५०० ते ४००० रुपये भाव आहे. तर आधारभूत किंमत ४३०० रुपये आहे, उत्पादन खर्च एकरी ८ ते १० हजार रुपये आहे.  गेल्या महिनाभरात तुरीच्या किमतीत १०%, हरभरा २०%, उडीद १५%, मुगाच्या किमतीत १४% घसरण झाली आहे. उत्पादन व खर्च यात मेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, मराठवाडा : १ जाने. ते १२ नोव्हें. मधील आत्महत्या ...

 

बातम्या आणखी आहेत...