आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरे खंडणीबहाद्दर खासदार; डिवचलेल्या दलित नगरसेवकांचा उलटवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहराच्या विकासात खोडा घालणारे खासदार चंद्रकांत खैरे खंडणीबहाद्दर असल्याचा आरोप सर्वपक्षीय दलित नगरसेवकांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. खैरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दलित नगरसेवकांची डी गँगचे सदस्य अशा शब्दांत संभावना केली होती.

त्याला प्रत्युत्तर देत भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अमित भुईगळ म्हणाले, डी गँग हा शब्दप्रयोग कुख्यात अतिरेकी दाऊद इब्राहिमसाठी वापरला जातो. मात्र, खैरे यांनी दलित नगरसेवकांसाठी वापरून आपल्या अकलेचे धिंडवडे काढले आहेत. दलित समाजातील नगरसेवक नागरिकांच्या मतांवर निवडून आलेले आहेत. खैरे यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप भुईगळ यांनी केला. खैरे यांनी शहराचा बट्टय़ाबोळ केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेतील पदाधिकार्‍यांनी एकही रस्ता दज्रेदार केला नाही. गेल्या 20 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले नाही. ड्रेनेज लाइनची वाट लागली आहे. आवश्यकता नसताना महावितरण कंपनीला शंभर कोटी रुपये खैरे यांनीच द्यावयास लावले. इंग्रजांनी दीडशे वर्षात केला नाही तेवढा बट्टय़ाबोळ खैरे यांनी 20 वर्षात केल्याची टीका नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी केली. खैरे पालिकेच्या सभागृहात ढवळाढवळ करतात. ते नसले तर त्यांचा एक व्हिडिओग्राफर सभेत असतो. ते शहर विकासात खोडा घालत असल्याचा आरोप माजी सभापती राजू शिंदे यांनी केला. या वेळी नगरसेवक विजेंद्र जाधव, रूपचंद वाघमारे उपस्थित होते. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...