आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dalit Panther 40 Yeras Celebration In Aurangabad

सत्तेच्या चावीसाठी पँथर जागे करण्याची गरज, रामदास आठवले यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सत्तेची चावी हाती घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी पँथर जागा करण्याची गरज असल्याचे आवाहन रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केले.

तापडिया नाट्यमंदिरात मंगळवारी (30 जुलै )पार पडलेल्या विभागीय कार्यकर्ता शिबिरात उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गंगाधर पानतावणे, अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव कदम यांची उपस्थिती होती. आठवले म्हणाले, 2014 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत खर्‍या अर्थाने पँथरची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. पँथरने आक्रमकपणे मोर्चा आणि आंदोलन करून समाजाचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावला. मात्र, नेत्यांमध्ये असणार्‍या मतभिन्नतेमुळे कार्यकर्ते विखुरले गेले आहेत. गरीब समाजातील प्रश्नांसाठी आंदोलन करा. साधने अपुरी असली तरी खेड्यापर्यंत पोहचा. आज तुमच्याकडे जी साधने आहेत ती पूर्वी नव्हती. ग्रामीण ते शहरी जनता एकवटली तर आगामी काळात सत्तेची चावी आपल्या हातात येईल. सर्व कार्यकर्त्यांनी मतभेत विसरून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले. आपण लातूर लोकसभा आणि औरंगाबाद येथील पूर्व आणि पश्चिम विधानसभेची जागा रिपाइंसाठी सोडण्याचा आग्रह केला आहे. या जागा मिळवण्यासाठी इच्छुकांनी सक्षमपणे तयारीला लागावे.

देश फुटण्याचा धोका नाही

देशाचे संविधान सर्वांना न्याय देणारे आहे. त्यामुळे देश फुटण्याचा धोका आपल्याला नाही. संविधान कोणीही लिहिले असते. मात्र, डॉ.बाबासाहेबांनी त्यात एक व्यक्ती एक मताचे मूल्य सर्वाना समान दिले. देशात कितीही दंगे-धोपे झाले तरी देशाला काही फरक पडत नाही. असे मतही आठवले यांनी व्यक्त केले. या शिबिरात ‘रिपब्लिकन पक्ष संघटना आणि दिशा’ या विषयावर अविनाश महातेकर यांनी, तर ‘2014 च्या सार्वत्रिक निवडणुका आणि रिपाइंची भूमिका’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे व अँड.गौतम भालेराव यांनी मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात ‘रिपाइं कार्यकर्त्याच्या समोरील आव्हाने’ या विषयावर कार्यर्त्यांनी मनोगते व्यक्त केली.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि राजकीय संघटना’ या विषयावर मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी समाज सुधारण्याचे काम हाती घेतले. मूकनायक, बहिष्कृत भारत आदी मासिकांद्वारे समाज सुधारण्याचे काम केले. त्यानंतर 1930 मध्ये राजकीय बाजू समजावून घेत समाजाला शिक्षण आणि चळवळीची सुरुवात केली. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. या माध्यमातून प्रश्न काय आहेत, हे समजून घेतले. डॉ.आंबेडकरांना वैयक्तिक शत्रू नव्हता. मात्र, वैचारिक लढय़ामुळे त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले. ते आजही कायम आहेत.

‘पँथरची चाळिसी’चे प्रकाशन

मिलिंद शेळके लिखित मराठवाड्यातील ‘पँथरची चाळिसी’ पुस्तक रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशित क रण्यात आले. या पुस्तकात पँथरच्या काळात आलेले अनुभव आणि आंदोलनाचा आढावा घेण्यात आला आहे. प्रकाशनानंतर पुस्तकाचे कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आले.