आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांची दांगट करणार तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांची कामे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. या रस्त्यांसाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांची विशेष समिती गठित करून शासनाने २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी दिला होता. कामेच होत नसल्यामुळे या कामांची तपासणी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट पुढील आठवड्यात करणार आहेत.
शासनाच्या निधीतून सुरू करण्यात आलेल्या एकाही रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या संदर्भात विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांनी आपण स्वत:हून पाहणी करणार असल्याचे सांगितले. मध्यंतरी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनाही त्यांनी रस्त्यांच्या कामांबाबत सूचना केल्या होत्या. निधीही मनपाला मिळाला आहे. कामांची यादीही निश्चित झालेली आहे. असे असताना कामे का बंद आहेत, याची माहिती आयुक्तांकडून घेतली जाईल, असे दांगट यांनी सांगितले. गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर, सेव्हन हिल्स ते सूतगिरणी चौक, एन-४ कामगार चौक ते महालक्ष्मी चौक, क्रांती चौक ते महावीर चौक आणि संत तुकोबानगर ते कासलीवाल कॉर्नर आदी रस्त्यांचा यात समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...