आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dangerous Electric Pole,latest News, Divya Marathi,

धोकादायक विद्युत खांब, जीर्ण वाहिन्यांमुळे अपघातांत वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-शहरातील विविध भागांतील विद्युत खांब आणि डीपी रस्त्यात असल्याने अनेक ठिकाणच्या वाहतुकीला अडथळा होत आहे. जुने विद्युत खांब आणि जीर्ण झालेल्या वाहिन्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. वीजपुरवठा खंडित होत असून जीटीएलला तोटा सहन करावा लागतो तर ग्राहकांना भुर्दंड बसत आहे.
आविष्कार कॉलनी, विद्यापीठ गेट ते मकई गेट, जवाहरनगर पोलिस ठाणे, औरंगपुरा नवीन भाजी मंडई, पुंडलिकनगर, चिकलठाणा, मुकुंदवाडी आदी ठिकाणी रस्त्यांमध्ये विद्युत खांब आणि डीपी आहेत. दोन खांबामध्ये 60 मीटरचे अंतर असून या वाहिन्यांना 7 ते 10 ठिकाणी जोड देण्यात आला आहे.याच वाहिन्यांवरून आवश्यकतेपेक्षा जास्त वीज कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे पुरवठा सतत खंडित होत आहे. दर शुक्रवारी देखभाल दुरुस्तीसाठी विजेचा पुरवठा बंद ठेवण्यात येतो. कमी जास्त दाबाने पुरवठा होत असल्याने उपकरणे जळून खाक होत आहेत. याचा ग्राहकांना फटका बसत आहे. शॉर्टसर्किट, खांबात विद्युत प्रवाह उतरून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.