आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दारणा'चे पाणी जायकवाडी धरणात येणे सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - दारणा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणाच्या साठ्यात २६८१ दलघमी अशी नव्याने वाढ झाली आहे. सध्या दारणातून ५ हजार ९०४ क्युसेक वेगाने पाणी गोदावरीच्या पात्रात येत असल्याने व नांदूर-मधमेश्वरातून जायकवाडीकडे ४ हजार क्युसेक वेगाने पाणी येत आहे. याच वेगाने पाणी येणे आणखी दोन दिवस सुरू राहिले तर धरणाचा मृत साठा जिवंत साठ्यात येईल, असे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सोमवारी सकाळी सहा वाजेदरम्यान जायकवाडी धरणात २६८१ दलघमी पाणी दाखल झाले. आगामी काळात आणखी पाणी धरणात येऊ शकते. या पाण्यावर औरंगाबाद, जालना, पैठण या शहरांच्या पाणीपुरवठ्यासह उद्योगांची तीन दिवस तहान भागवली जाऊ शकते. त्यामुळे या शहरांना थोडा दिलासा मिळाला आहे.