औरंगाबाद- औरंगाबादकरांचे वाहनप्रेम जगप्रसिद्ध आहे. एकाच वेळी 150 मर्सिडीझची खरेदी कल्यामुळे मर्सिडीझचे शहर म्हणूनदेखील औरंगाबादची चर्चा होते. यंदा दस-याच्या मुहूर्तावर शहरात सुमारे 400 चारचाकी, तर 3 हजार दुचाकींची बुकिंग करण्यात आली आहे. या माध्यमातून सुमारे 70 कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा अंदाज ऑटो
मोबाइल व्यवसायातील तज्ज्ञ नरेश देशपांडे आणि हरिओम सुझुकीचे संचालक जगदीश बियाणी यांनी वर्तवला आहे.
वाहन खरेदी करण्यासाठी विविध बँका तत्काळ अर्थसाह्य उपलब्ध करून देतात. सामान्यांनादेखील आता चारचाकीचे स्वप्न सहज पूर्ण करता येते. चारचाकी वाहनांमध्ये पेट्रोल गाड्यांना अधिक मागणी आहे, तर दुचाकीची खरेदी करताना ग्राहकांकडून अॅव्हरेजला प्राधान्य दिले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांिगतले. चारचाकी वाहनात जपानी टेक्नॉलॉजीला प्राधान्य देण्यात येते. अनेकांनी दसऱ्याचा मुहूर्त साधण्यासाठी किमान सहा महिने अगोदर गाड्यांची बुकिंग करून ठेवली होती. गाडी खरेदी करताना
आपली नेमकी गरज आणि बजेट यांचा ताळमेळ घालता आला पाहिजे, असे मत बालाजी कार रेन्टल अँड ट्रॅव्हल्सचे संचालक संतोष पवार यांनी व्यक्त केले.