आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दसऱ्याच्या खरेदीची रेलचेल, दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात २५० कोटींची उलाढाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदापाऊस छान झाल्यामुळे शेतकरी आणि कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी विजयादशमी असल्यामुळे शहर आणि परिसरातील वातावरण मंगलमय झाले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणानिमित्त नागरिकांनी नवे कपडे, मोबाइल, इलेक्ट्राॅनिक्सच्या वस्तू, गृहखरेदी, गाडी आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी शहरातील विविध भागांत गर्दी केली होती. शिवाय आज रविवार असल्यामुळे अनेक जण सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडले होते. २५० कोटींची उलाढाल होईल असा अंदाज व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
टिळक पथ, निराला बाजार, प्रोझोन अशा सर्वच ठिकाणी खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती. चारचाकी गाड्यांच्या दालनात आधीच बुक करून ठेवलेल्या गाड्यांची कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू हाेती. सोन्याची बाजारपेठही बहरून गेली आहे. प्रत्येक दुकानावर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. रविवारी अष्टमीचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांनी खरेदी केली.

कपड्यांवर इंडोवेस्टर्न छाप...
सणोत्सवांना पारंपरिक वस्त्र परिधान करण्यावर भर दिला जातो. पण, त्यामध्येही नवे पण असावे, काळाशी सुसंग असावे म्हणून इंडोवेस्टर्न कपड्यांना तरुणाई आणि बच्चे कपंनी विशेष पसंती देताना दिसली. यामध्ये भारतीय नक्षीकामाची झलक असलेले स्कर्ट, जरीकाम, जर्दोजी केलेले क्राप टॉप, लाँग टॉप, वन पीस तर जीन्समध्येही वर्क असलेल्या जीन्स, भारतीय कलांचे दर्शन घडवणारी पेंटिंग्ज असलेल्या पलाझो पॅन्ट तरुणींची पहिली पसंती ठरले. तर पुरुषांच्या कपड्यांमध्ये सेमी फॉर्मलची खरेदी अधिक प्रमाणात झाल्याचे एका दालनातील जाणकाराने सांगितले. शहागंजच्या बाजारपेठेत ग्रामीण भागातील ग्राहकांचा मोठा राबता दिसला.

चित्र समाधानाचे अन् आनंदाचे
^यंदाच्या बाजारपेठेचे चित्र समाधानाचे आणि आनंदाचे आहे यात शंका नाही. उलाढालीचा अंदाज ठरवणे योग्य नाही कारण सर्वच क्षेत्रात ग्राहकांची गर्दी दिसली. अजयशहा, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

गृहखरेदीचा मुहूर्त साधला
दसऱ्याचा मुहूर्त कॅश करण्यासाठी विविध गृहप्रकल्पांचे प्रदर्शन आणि जाहिरातील मागील काही दिवसांपासून ग्राहकांच्या दिमतीला उभी होती. काहींनी सर्व पूर्तता झाल्याची खातरजमा आज केली तर काहींनी आजचा मुहूर्त साधत नोंदणी केली.

सुवर्ण खरेदीचा योग जुळला
गेल्या ते वर्षांच्या तुलनेत यंदा बाजारात तेजी असल्याचे सराफ व्यापारी संघटनेचे राम वारेगावकर यांनी सांगितले. पसंतीनुसार ऑर्डर करून दागिने तर लोकांनी घेतलेच. पण मुहूर्त लक्षात घेऊन अनेक प्रा. लि. कंपन्यांनी नव्या डिझाइनही बाजारात आणल्या त्याला चांगली पसंती मिळाली.
बातम्या आणखी आहेत...