आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'जय श्रीराम\'च्या जयघोषात रावणदहन, ३२ वर्षांची परंपरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाईटप्रवृत्तींचा नाश करून सकारात्मकतेने वाटचाल करण्यासाठी बळ देणारा रावणदहनाचा सोहळा एन-७ आणि मयूरनगरात झाला. तरुणाईच्या अभूतपूर्व जल्लोषात आणि जय श्रीरामच्या जयघोषात हा सोहळा पार पडला. रावणाच्या महाकाय प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन होताच हा सोहळा चिमुकल्या डोळ्यांत साठवणारी बच्चे कंपनीही कुतूहलाने उजळून निघाली. या लक्षवेधी सोहळ्याच्या साक्षीदारांनी परस्परांना विजयादशमीच्या शुभेच्छाही दिल्या. एन-७ च्या मैदानावर मंगळवारी चारपासून रामलीला सुरू झाली. सायंकाळी हळूहळू नागरिकांची गर्दी झाली. रात्री च्या सुमारास रावणदहन झाले.

हडकोत विजय यात्रा
हडको एन-११ येथील मयूरनगरात शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने चार वाजता ढोल-ताशांच्या गजरात भगवान श्रीरामाची विजय यात्रा काढण्यात आली. यंदाचे मंडळाचे हे दुसरे वर्ष आहे. परिसरातील शेकडो नागरिक या यात्रेत मोठ्या उत्साहात सहभागी झाले. सातच्या सुमारास ही यात्रा श्री स्वामी समर्थ मैदानात पोहोचली. सायंकाळी ७.३० वाजता रावणदहन झाले. या वेळी सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांच्यासह संस्थापक मनोज मेठी, विशाल आहेर आणि अध्यक्ष राहुल तायडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौराहातून निघाली पालखी मिरवणूक
चौराहातून सायंकाळी वाजता भगवान बालाजीच्या पंचधातूच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. राजाबाजार, पानदरिबा, मछली खडक, सुपारी मारुतीमार्गे १० च्या सुमारास ही पालखी चौराहात परतली. दर्शनासाठी आलेले शेकडो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. अनेक भाविकांनी रस्त्यांवरही पालखीचे दर्शन घेतले.

पुढील स्लाईडवर पाहा, दसऱ्याच्या उत्सवाचे इतर फोटो...
बातम्या आणखी आहेत...