आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'क्यूं पाटील, और लढोगे....\' \'क्यूं नही, बचेंगे तो और भी लढेंगे....!\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीर मराठा सेनानी दत्‍तोजी शिंदे यांचा पानिपतच्‍या लढाईमध्‍ये अब्दालीच्‍या सैन्‍यांनी 10 जानेवारी 1731 रोजी शिरच्‍छेद केला. त्‍याला आता 255 वर्षे पूर्ण होतील. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com ने दत्‍तोजींच्‍या शौर्याला दिलेला हा उजाळा.
अखेरचे शब्‍द झाले अजरामर
दत्‍तोजींच्‍या तुकडीला अफगाणी रोहिल्‍यांनी घेरले. मराठ्यांच्‍या काहीच सैनिकांकडे बंदुकी होत्‍या. या उलट प्रत्‍येक रोहिल्‍यांकडे तोफ आणि बंदुकी होत्‍या. त्‍यामुळे मराठे त्‍यांच्‍यापुढे हतबल झाले. मात्र, हार मारणार ते मराठे कसले. निधड्या धातीवर गोळ्या झेलत मराठे पुढे-पुढेच जात होते. यात दत्‍तोजीही आघाडीवर होते. दरम्‍यान, कुतुबशहाने त्यांच्यावर बंदूक रोखली. तरीही दत्‍तोजी तलावर घेऊन त्‍याच्‍यावर चाल करून गेले. मात्र, त्‍याने त्‍यांच्‍यावर गोळी झाडली. दत्‍तोजी धारातिर्थी पडले. कुतुबशहा त्‍यांना म्हणाला, "क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?" दत्‍तोजींनी आपला क्षीण होत चाललेला आवाज एकवटला आणि वाघाने डरकाळी फोडावी तसे उद्गारले, "क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!" त्‍यांचे हेच शब्‍द संपूर्ण भारतीय अपखंडात आज अजरामर झाले.
पुढील स्‍लाइड्सवर, अगोदर गोळी मारली, नंतर केला शिरच्‍छेद... मराठ्यांनी लपून ठेवले होते दत्‍तोजींचे धड...