आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swardhyas Foundation Actor Clean Dauilatabad Fort

स्वरध्यास फाउंडेशनच्या कलावंतांनी स्वच्छ केला दौलताबाद किल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वरध्यास फाउंडेशनच्या कलावंतांनी रविवारी दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, जंकफूडची पाकिटे जमा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. किल्ल्यातील पायऱ्या, चढताना आणि उतरतानाचा परिसर दोन तासांत स्वच्छ केला. १५ पिशव्या कचरा जमा करण्यात आला.
दौलताबाद किल्ला ऐतिहासिक वास्तू असून येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. येथे घडणारे अस्वच्छतेचे दर्शन देशाची प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी असा विचार सर्वांनी केला. मोहिमेत फाउंडेशनचे संचालक सचिन नेवपूरकर, सुश्मिता डवाळकर, प्रतीक डवाळकर, रूपाली ठोसर, प्राची देशपांडे, रुतुपर्णा महाजन, वरद पिंपळे आणि अतुल दाभाडे यांचा सहभाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनात शहरातील प्रत्येक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय प्रतिसाद देत आहेत. देशातील प्रत्येेक सार्वजनिक ठिकाण स्वच्छ असावे, हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वांसाठी लाभदायी आहे. किल्ल्याच्या परिसरात चढताना आणि उतरताना दोनच ठिकाणी डस्टबिन ठेवण्यात आली आहे, हेदेखील अस्वच्छतेचे एक कारण आहे.
पर्यटक जंकफूडची पाकिटे आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या डस्टबिन येईपर्यंत सांभाळत नाही. यासाठी डस्टबिन्सची संख्या वाढवण्याची गरज आहे. ठिकठिकाणी स्वच्छता संदेश देणारे फलक लावण्यात यावे,अशी अपेक्षा या कलावंतांनी व्यक्त केली आहे.