आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारी दौलताबादेत रंगणार प्री मॅरेथॉन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद ब्लॅक बक्स ग्रुपच्या वतीने रविवारी (२३ ऑक्टोबर) प्री मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. दौलताबाद घाटात नयनरम्य वातावरणात ही मॅरेथॉन पार पडणार असून अधिकाधिक औरंगाबादकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
२७ नोव्हेंबर रोजी एमआयटी औरंगाबाद हेरिटेज हाफ मॅरेथॉन (एमएएचएचएम) होणार असून त्याच्या पूर्वतयारीसाठी रविवारी ही प्री मॅरेथाॅन होत आहे. रविवारी एचटूओ वॉटरपार्क, दौलताबाद येथून सुरू होणारी ही मॅरेथॉन ५, १० आणि १५ किलोमीटर प्रकारांत होईल. सहभागी धावपटूंना चेस्ट नंबर दिले जाणार असून तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही केले जाणार आहे. पाणी तसेच वैद्यकीय सुविधाही उपलब्ध असेल.

स्पर्धकांनी सकाळी ५.४५ वाजता स्पर्धास्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. १५ किलोमीटरची स्पर्धा ६.३० वाजता तर आणि १० किलोमीटरची स्पर्धा ६.४० वाजता सुरू होईल. इच्छुकांनी www.aurangabadrunning.com या संकेतस्थळावर नांेदणी करावी, जास्तीत जास्त धावपटूंनी या मॅरेथाॅनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वाहतूक वळवणार
प्री मॅरेथॉनमुळे रविवारी पहाटे ते सकाळी ११ या दरम्यान दौलताबाद टी पॉईंट ते वेरूळपर्यतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. वाहनधारकांनी औरंगाबादकडून वेरूळ, कन्नडमार्गे धुळ्याकडे जाताना दौलताबाद टी पॉईंट, माळीवाडा गाव, कसाबखेडा या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...