आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दौलताबादच्या केंद्रात आरोग्य खात्याचा गलथान कारभार चव्हाट्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद - प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचा-यांनी उपचार नाकारल्याने रुग्णालयासमोर उघड्यावरच महिलेची प्रसूती झाली. दौलताबादेत मंगळवारी घडलेल्या या घटनेने आरोग्य खात्याचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
माळीवाडा येथील झुमरी रणजित सुके यांची अस्मिता निंबाळकर या परिचारिकेनेच तपासणी केली. रक्त कमी असून, येथे प्रसूती होणार नाही, असे तिने सांगितले. महिलेला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला तिने दिला. महिलेला घेऊन नातलग बाहेर आले. तेवढ्यात वेदना असह्य झाल्याने गर्भवती रस्त्यावरच आडवी झाली. नातलग भांबावले. आजूबाजूच्या महिला धावून आल्या. साड्या, चादरी आडव्या लावल्या, पण प्रसूती कशी करावी याची माहिती नसल्याने नातेवाईक परिचारिकेला बोलावण्यास गेले. परिचारिका पोहोचण्यापूर्वीच प्रसूती झाली होती. एका गोंडस मुलाला तिने जन्म दिला होता.
डॉक्टर नव्हते, नर्सनेच सांगितले; ‘रक्त कमी , घाटीत घेऊन जा’
* दौलताबाद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे हे 15 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गेले आहेत.
* बदली डॉक्टर रेखा भंडारी यासुद्धा केंद्रात नव्हत्या. कार्यशाळेमुळे गैरहजर राहिल्याचे त्या म्हणाल्या.
* परिचारिकेनेच तपासणी करून निदान केले आणि औरंगाबादला घाटीत नेण्याचा सल्ला दिला.
दुसरी घटना - वैजापूर तालुक्यात परसोडा येथे 27 एप्रिल रोजी व्हील चेअरवरच प्रसूती झाली होती. 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेले मूल दगावले होते.
चहाच्या टपरीमध्ये प्रसूती; पश्चिम बंगालमधील घटना
कोलकात्यात रस्त्यातच प्रसूती आणि महिलेचा मृत्यू
रुग्णालयाच्या परिसरातच महिलेची प्रसूती
दवाखान्यातही ‘तिची’ प्रसूती आईनेच केली
मोबाइल बॅटरीच्या उजेडात केली प्रसूती
अशुभ दिवसामुळे प्रसूती डॉक्टरने लांबवली आणि ...