आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीबी स्टार: वृत्त वाचूनच उभारली वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दै. दिव्य मराठीच्या जल अभियानामुळे पाणी बचतीचे अनेक मार्ग दिसत आहेत. सभोवतालची परिस्थिती पाहिली की बहुतांश लोकांना पाण्याचे महत्त्व कळून चुकले आहे. पाणी वाचवण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येऊन पाणी वाचवण्यात पुढाकार घेत आहेत. डीबी स्टारमधे स्वप्निल सराफ यांनी केलेल्या वॉटर हार्वेस्टिंगचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यापासून प्रेरणा घेऊन आणखी एका नागरिकानेही हा प्रयोग आपल्या घरात केला. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात..

पाण्याची बचत महत्त्वाची
मी सिडको एन-4 मध्ये राहतो. माझे नाव प्रशांत बक्षी आहे. आठ दिवसांपूर्वी 5,000 रुपयांत वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा उभी केली. मी सतत बाहेर फिरत असतो. त्यात जालना किंवा मराठवड्यातील कोणतेही गाव सध्या पाण्यावाचून ओस पडल्याचे लक्षात आले आहे. गावकरी पाण्यासाठी शहराकडे धाव घेत आहेत. यामुळे शहरवासीयांची जबाबदारी वाढली आहे. अशातच डीबी स्टारमध्ये पाणी वाचवण्याच्या अभियानात भाग घ्यावा वाटला. त्याच वेळी स्वप्निल सराफ यांनी 5 हजारांत वॉटर हार्वेस्टिंग केल्याची बातमी 19 फेब्रुवारी रोजी वाचली. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आणि मीही हा प्रयोग माझ्या घरी केला. पावसाचे व सांडपाणी जमिनीत बोअरजवळ सोडले. टेरेसवर दोन पाइप लावून पाणी 5 फूट खड्डय़ात जमा केले. या खड्डय़ाला विटा, खडी,वाळू,परत विटा व कोळशाचा थर दिला. या थरामुळे पाणी व्यवस्थित जमिनीमध्ये मुरेल. हे पाणी बोअरच्या जवळ साठून पाण्याचा थर कायम मेंटेन राहील. यामुळे आम्हाला पाण्याची कमतरता जाणवणार नाही याची खात्री आहे.