आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजीवनी भेट अभियान: पहिल्याच दिवशी हजार घरात तुळस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीबीस्टार आणि गायत्री चेतना केंद्राच्या वतीने सुरू झालेल्या संजीवनी भेट अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमातील सर्व सहाही केंद्रांवर वाचक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तुळशीची रोपे नेली. स्वत:बरोबरच इतरांनाही ही रोपे स्वत: तयार करून देण्याचा संकल्प या वेळी असंख्य लोकांनी केला. बुधवारी एकाच दिवसात

जवळपास हजार जणांना रोपांचे वितरण करण्यात आले. दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संस्थेने यापुढे कुठल्याही कार्यक्रमात बुकेऐवजी तुळस रोप भेट
देण्याचा संकल्प केला. तसेच बांधकामांजवळ सुशोभीकरणाची झाडे लावत असताना तुळशींचीही आवर्जून लागवड करण्यार असल्याची घोषणा या संघटनेने केली.
यश कन्स्ट्रक्शन प्रायोजक असलेल्या संजीवनी भेट अभियानाला बुधवार, १० डिसेंबर रोजी सुरुवात झाली. सामान्य नागरिकांपासून उद्योजकांपर्यंत सर्वच स्तरांतून स्वागत
होत आहे. सिडको एन-६, सिडको गरवारे कम्युनिटी सेंटर, अजबनगरातील गायत्री परिवार केंद्र, माळीवाड्यातील गायत्री चेतना केंद्र, पदमपुऱ्यातील यश कन्स्ट्रक्शनचे
कार्यालय आणि एन-६ सिडकोतील अरुण इलेक्ट्रॉनिक्स आदी केंद्रांवरून तुळशींचे वितरण केले जात आहे. पहिल्या दिवशी विविध केंद्रावरून हजार तुळशी रोपांचे वितरण
करण्यात आले.

-तुळस इतर औषधी वनस्पतींचे गुण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उत्तम प्रयत्न आहे. क्रेडाईच्या सर्वसाधारण बैठकीत तसेच सर्व कार्यक्रमांमध्ये मान्यवरांना बुकेऐवजी
तुळशीचे रोप भेट दिले जाईल. -पापालाल गोयल, अध्यक्ष,क्रेडाई
-तुळशीचेमहत्त्व ओळखून वॉटर हार्वेस्टिंग आणि शोभेच्या वृक्षांसह तुळशी रोपे लावण्याचा संकल्प करत आहोत. संजीवनी भेट अभियानाला आमचा नेहमीच पाठिंबा
राहील. -भास्कर चौधरी, अध्यक्ष,आयकॉन लॉयन्स क्लब