आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रांमधून विद्यार्थ्यांचा सामाजिक संदेश, प्रदर्शन भरवून कल्पकतेचे दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सालाबादप्रमाणे यंदाही शासकीय कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक प्रदर्शन आजपासून सुरू झाले. पेंटिंग, अप्लाइड आणि टेक्सटाइलच्या विद्यार्थ्यांनी विविध चित्रे मांडून कलाविष्कार सादर केला आहे. वर्षभर केलेल्या कामाची दखल यातून घेतली जाते. या कला प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते झाले. या वेळी भारतीय पुरातत्त्व खात्याचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा, प्रभारी अधिष्ठाता भरत गढरी, प्रा. विजय सुरळकर, प्रबंधक विनोद दांडगे यांची उपस्थिती होती. 

या प्रदर्शनाबरोबरच महाविद्यालयाचे स्नेहसंमेलनही दरवर्षी होत असते. किंबहुना स्नेहसंमेलनाचाच हा एक भाग आहे. महाविद्यालयांच्या विविध विस्तीर्ण हॉलमध्ये भरलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी दरवर्षी गर्दी होते. या प्रदर्शनातून त्या त्या वर्गातील मुलांचे नंबर काढले जातात. उत्कृष्ट चित्रांना बक्षीस दिले जाते.
 
या प्रदर्शनाच्या काळात महाविद्यालयाच्या परिसरात नेहमीपेक्षाही जास्त चैतन्य असते. यंदाही पेंटिंग, उपयोजित कला आणि टेक्सटाइलच्या विद्यार्थ्यांनी व्यक्तिचित्रे, निसर्गचित्र, स्केचिंग काढून विषयानुरूप कल्पकतेने त्यांचा डिस्प्ले केला आहे. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. यात महाविद्यालयातील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. 
बातम्या आणखी आहेत...