आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेक्षणीय पॅचवर्क: कमी पैशांत महापालिकेचे भन्‍नाट काम, रस्त्यांवरील कलाकृतींसाठी आभार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एकीकडे पालिकेकडे पैसे नाहीत, दुसरीकडे पॅचवर्क सुरू आहे. या कमी पैशात मॉडेल पॅचवर्क केले जात आहे. इंडियन रोड काँग्रेसचे नियम, तज्ञांचे मत काहीही असो, मात्र या पॅचवर्कचे हे भन्नाट काम डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. २-४ कोटी खर्च करून, लोकांचा त्रास कमी होत नसला तरीही रस्त्या-रस्त्यावरील कलाकृतीसाठी संबंधित सर्व कलाप्रेमींचे आभार मानायला हवे. 


सिडको एन-१पोलिस चौकीपासून प्रोझोन मॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर झालेले हे ‘पॅचवर्क कसे नसावे’ याचे ‘आदर्श’ मॉडेल आहे. मधोमध जागोजागी आडवे, तिरपे, उभे असे काही कमी तर काही लांब लांब पट्टे करून हे पॅचवर्कचे काम करण्यात आले. काही पट्टे तर इतके लांब आहेत की त्यामुळे एका बाजूचा रस्ता उंच तर दुसऱ्या बाजूचा एकदम खाली अशी स्थिती झाली आहे. विशेष म्हणजे या लांब पट्ट्याच्या पॅचवर्कमध्येही पुन्हा मध्यभागी खोलगट तळवे झाले आहेत. परिणामी या पट्ट्यातही मध्यभागी पाणी साचेल, अशी ‘सोय’ करण्यात आली आहे. 

 

तज्‍ज्ञांचे हे असे आहे 

1) रस्त्याचा जो भाग खराब आहे त्याचीच आसपासची खडी काढून डांबर मिस्क करून पॅचवर्क केले पाहिजे. यातून महानगरपालिकेचा पैसा आणि वेळ वाचेल. शिवाय हे काम जास्त काळ टिकून राहील. 

- डॉ.गजेंद्र गंधे, देवगिरीअभियांत्रिकी महाविद्यालय, विभागप्रमुख, सिव्हिल विभाग 

 

2) मोठे खड्डे असले तर खाली त्याला चारही बाजूंनी खोदून त्याचा चौकोनी बेस तयार करावा. त्यानंतर त्यावर बीएम करून नंतर सीलकोट करावे. प्रत्यक्षात पॅचवर्कचे काम ढोबळमानाने केलेले आहे. व्हीआयपी मार्गाव्यतिरिक्त कुठेही सीलकोट केले नसल्याने मोठी खडी लॉक झालीच नाही. परिणामी वाहनांच्या वर्दळीने उखडून ती रस्त्यावर पसरली आहे. 
- डॉ.निखिल जयस्वाल, स्थापत्य अभियंता 

 

3) जिथे खड्डा आहे त्याच्या ऑडशेपपर्यंत चारही बाजूंनी चौकोनी खड्डा जुन्या सरफेसपर्यंत खोदावा. खडी भरावी. त्यावर ५० एमएम डांबरमिश्रित खडीचा पहिला थर टाकून त्याची रोलरने दबाई करून त्यावर एसडीबीसी २५ एमएम डांबर मिश्रित खडीचा दुसरा थर टाकावा. त्यावर एसडीबीसी एमएम डांबरमिश्रित खडीचा तिसरा थर टाकावा. मात्र, हे होत नसल्यानेच पॅचवर्क उखडते. 
- डॉ.अदिती डकले, स्थापत्य अभियंता 

 

 

काय म्हणतात ठेकेदार? 

मोठया खड्ड्याचे खडीकरण आणि मजबुतीकरण जीएसबी (ग्रन्युअल सबबेस) त्यानंतर मोठी खडी(वेटमिक्स) टाकून त्यावर बीएम आणि सिलकोट करत आहोत. खोदकाम करून पॅचवर्क केले तर २४ ते ४८ तास वाहतूक व्हायला नको. ओल्या कामावर वाहतूक सुरू असल्याने अनेक ठिकाणी उखडलेले दिसते. त्यावर सिलकोटचे काम बाकी आहे.
- आर.एस.संधा,नितिन गायकवाड, पी. जी.पवार, उपअभियंता 

 

व्हीआयपी वगळता अन्य रस्त्यांवर एसडीबीसी एमएम डांबरमिश्रित खडीचा दुसरा थर टाकणे सीलकोटचे काम बाकी आहे. शहरातील रस्त्यांवर लहान स्वरूपाचे खड्डे असल्याने पॅचवर्क करताच येत नाही. तेथे असे मोठे उंचवटे दिसतात, पण सीलकोटनंतर त्याची दबाई करणार आहोत. 
- खाजा अमीन, विजय अरोरा, शेख जाहेद, एम.एम.सिद्दिकी (सर्व ठेकेदार) 

 


पुढील स्‍लाइडवर पाहा, शहरातील विविध रस्त्यांवर झालेले अजब नक्षीकाम आणि रुपेश कलंत्री यांची कॉमेंट...

 

डीबी स्टारविषयी तुमच्या तक्रारी, सूचना, प्रतिक्रिया असल्यास आम्हाला editor.dbstar@dbcorp.in या ई-मेलवर किंवा ९०४९०६७८८८ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस करू शकता. (कृपया कॉल करू नये) 

बातम्या आणखी आहेत...