आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: ‘आडत’मुक्तीवर ‘उचल’ची युुक्ती; कायद्याने सूट, तरीही होते प्रचंड लूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अड (त) कित्त्यात बळीराजा : भाग १
 
औरंगाबाद- शासनाने गतवर्षी शेतकऱ्यांकडून आडत घेण्यावर बंदी घातली. मात्र, शहरात जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून सर्रास आडत वसूल केली जात आहे. यात शेतकऱ्याला मिळालेल्या पैशांमधून तब्बल आठ ते दहा टक्के रक्कम वसूल केली जातेे.
 
अधिकृत पट्टीवर उचल वा गाडीभाड्याच्या कॉलममध्ये ही रक्कम दाखवली जाते. प्रत्यक्षात उचल वा गाडीभाडे दिले जात नाही. एखाद्या शेतकऱ्याने संबंधित आडत्याला विचारले तर त्याच्याकडून उत्तर येते, ‘आडत लागतेच! माल टाकायचा असेल तर टाका नाहीतर घेऊन जा.’ शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये कसे लुबाडले जाते, याचे डीबी स्टारने स्टिंग ऑपरेशन केले.
 
२०१४ मध्ये तत्कालीन पणन संचालक सुभाष माने यांनी आडतमुक्तीचा निर्णय घेतला होता. एखाद्या शेतकऱ्याने आपला शेतमाल विकण्यासाठी बाजार समितीमध्ये आणल्यास आडत्याकडे (कमिशन एजंट) उतरवला जातो. सकाळच्या वेळी  येथे खरेदीदार व्यापारी जमतात आणि बोली लावून शेतीमाल खरेदी करतात. यात संपूर्ण शेतीमालाचे जेवढे पैसे होतील, त्या पैशांपैकी आठ ते दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून राजरोसपणे घेतली जात होती.  
 
मात्र, शेतकऱ्यांवर पडणारा आडतचा भार शेतकऱ्यांऐवजी खरेदीदार व्यापाऱ्यांनी उचलावा, असा निर्णय पणन संचालकांनी घेतला होता. त्याला राज्यभरातील व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानेे त्याला महिनाभरातच स्थगिती देण्यात आली. अखेर २०१५ मध्ये सरकारने शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या आडतला चाप लावून खरेदीदार व्यापाऱ्यांकडून आडत घ्यावी, असा कायदाच आणला. यानंतरही आडते शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, डीबी स्टारने केलेले स्टिंग आणि व्हिडिओ... 

 
बातम्या आणखी आहेत...