आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: पुलावरून वाहून गेलेल्या तरुणाचा 18 तासांनी मृतदेह हाती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाण्याचा अंदाज घेता पूल ओलांडण्याचा प्रयत्न करणारा तरुण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास चिकलठाणा येथील शनी मंदिर पुलाजवळ घडली. १८ तासांच्या शोधमोहिमेनंतर कृष्णा एकनाथ कोरडे (२२, रा. जांभळीची वाडी, झाल्टा फाट्याजवळ) या तरुणाचा मृतदेह सापडला.
 
कृष्णा त्याचा मित्र नारायण रतन बारंडवाल हे दुचाकीने रात्री गावाकडे जात होते. त्यासाठी त्यांनी चिकलठाणा जवळील जुना बीड बायपास रोडवरील शनी मंदिर पुलावरून जाणारा मार्ग निवडला. या पुलावरून पाणी वाहत होते. त्यांनी पाण्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला आणि ते पडले. कृष्णा वाहून गेला. तर नारायण बचावला. शनिवारी सिडकोच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून त्याची होंडा शाइन दुचाकी (एमएच २० सीडब्ल्यू ७९७२) घटनास्थळीच पडून होती. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास पुलापासून जवळच पाण्याच्या तळाशी अडकलेला कृष्णाचा मृतदेह सापडला. 
बातम्या आणखी आहेत...