आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत महिलेच्या पतीचा पोलिसांनी घेतला जबाब, संबंध नसल्याचे म्हटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; हुसैन कॉलनीत शनिवारी जळून मृत पावलेल्या महिलेच्या पतीचा पोलिसांनी शोध घेऊन त्याचा जबाब घेतला. अनिल पवार, रा. चितेगाव असे त्याचे नाव आहे. मागील तीन वर्षांपासून आपला मृत रतनाशी काहीही संबंध नसल्याचे त्याने जबाबात म्हटले आहे.
हुसैन कॉलनीतील गल्ली नंबर पाचमध्ये ४० ते ४५ वर्षीय महिलेचा जळाल्याने मृत्यू झाला. प्रथम तिचे नाव रत्ना श्याम पगारे असे सांगण्यात येत होते. मात्र पोलिसांनी तिच्या पतीचा शोध घेतल्यानंतर तिचे नाव रत्ना अनिल पवार असे निष्पन्न झाले. सहा वर्षांपासून दोघे विभक्त राहत होते. सिडको एन- येथे वडिलांच्या घराजवळ रत्नाने खोली भाड्याने घेतली होती. महिनाभरापूर्वीच ती हुसैन कॉलनीत राहायला गेली होती. रत्नाला दोन अपत्ये आहेत. मुलगा नवऱ्याकडे राहत होता तर मुलगी तिच्यासोबत राहत होती.
मुलीचे लग्न झाले आहे. रविवारी तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. ती दहा बाय दहाच्या खोलीत राहत असताना तिच्या ओरडण्याचा आवाज कोणालाच कसा आला नाही. शनिवारी तिच्याशी भांडण करणारा स्वत:ला तिचा नवरा सांगणारा व्यक्ती कोण आदी प्रश्न पोलिसांना पडले आहेत. जमादार गोवर्धन चव्हाण पुढील तपास करीत आहेत.