आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर समुहाचे ग्रीन आयडल अवॉर्ड्ससाठी अर्जाची अंतिम मुदत 15 जून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दैनिक भास्कर समूहाच्या ग्रीन आयडल अवॉर्ड्ससाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जून आहे. पर्यावरण संवर्धनात महत्त्वाची भूमिका पार पाडणा-या व्यक्ती, समूह किंवा संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. नाव नोंदणी अर्ज ‘दिव्य मराठी’च्या 5 जून व 12 जूनला प्रकाशित करण्यात आला आहे.


या राज्यस्तरीय पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष आहे. हे पुरस्कार वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपात दिले जातात. ज्या व्यक्ती, समूह किंवा अशासकीय संस्था वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन किंवा इतर कोणत्याही मार्गाने पर्यावरण जतनाच्या कार्यात ठोस योगदान देत असतील, ते या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. अर्जदार या क्षेत्रात गेल्या किमान तीन वर्षांपासून कार्यरत असावा. शासकीय अनुदान किंवा आर्थिक साहाय्य न घेता अर्जदाराने या क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याने वृक्षवेलींचे जतन वा संवर्धन होण्यास मदत झालेली असावी. ग्रीन आयडल अवॉर्ड्ससाठी संपूर्ण राज्यातून प्राप्त होणा-या अर्जांमधून वैयक्तिक व सामूहिक गटातून 3-3 विजेत्यांची निवड होईल. याशिवाय दोन्ही गटांतून उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रत्येकी 10 अर्जदारांना गौरवण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी 9822068989 वर संपर्क साधावा.