आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजतारांना चिकटला; आईच्या डोळ्यांदेखत मुलाचा जळून मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुन्न झाली माऊली - Divya Marathi
सुन्न झाली माऊली
जळगाव - झाडावर अडकलेला पतंग काढण्यासाठी गेलेल्या एका तरुण मुलाचा शुक्रवारी उच्च दाबाच्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे जोरदार झटका बसून जळून मृत्यू झाला. ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशीच जोशी कॉलनीत सायंकाळी वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. दुर्दैव असे की, विजेच्या तारांना चिकटल्यानंतर आजूबाजूच्या मुलांनी पाहिल्याने काॅलनीत गलका झाला. हे ऐकून त्याची आई घराबाहेर आली आणि डोळ्यांदेखत मुलाचा जळून मृत्यू पाहणे दुर्दैवी आईच्या नशिबी आले. हा तरुण सुमारे २० मिनिटे तारांवर लटकून होता. तारांना चिकटल्याचे पाहिल्यानंतर शेजारच्या नागरिकांनाही काय करावे? हे कळेनासे झाले. अखेर एका ज्येष्ठ नागरिकाने पुढाकार घेतला. मग नागरिकांनी बांबूच्या साह्याने त्या तरुणाला वीजतारांवरून खाली काढले. त्या तरुणाच्या आईसोबतच जोशी कॉलनीतील नागरिकांनीही तरुण पेटल्याचे भयंकर दृष्य पाहिले आणि त्यांच्या अंगाचाही थरकाप उडाला.
मनोज रमेश जोशी (वय १९) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून तो तेली समाज संकुलातील शकुंतला एन्टरप्रायजेस दुकानात कामाला होता. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत नूतन मराठा महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षात त्याचे शिक्षणही सुुरू होते. शुक्रवारी दुपारी वाजेच्या सुमारास जेवण करून मनोज आपले मित्र अक्षय झोपे, दीपक परदेशी यांच्यासह पतंग उडवण्यासाठी शेजारच्या ‘माऊली या घराच्या गच्चीवर दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास गेला. चाळीसगाव येथील पोलिस कर्मचारी मिलिंद जोशी यांचे ते घर आहे. मनोज मित्रांसोबत पतंग उडवत असताना सायंकाळी वाजेच्या सुमारास त्याचा पतंग माऊली इमारतीसमोरील झाडावर अडकला. त्यामुळे गच्चीच्या समोरील लोखंडी ग्रीलवरून मनोज पतंग काढण्याचा प्रयत्न करू लागला.
सुन्न झाली माऊली
रोहित्रावरमोठा आवाज झाल्यानंतर मनोजची आई मराबाई घराच्या गॅलरीत आल्या. तारांवर लटकलेल्या पोटच्या गोळ्याला बघून ती माऊली सुन्न झाली. कपड्यांनी पेट घेतल्याने त्याचे शरीरही भाजत होते, अशा अवस्थेत मराबाई त्याला घराच्या गॅलरीतून बघत होत्या, असा हा कारुण्यमय प्रसंग बघून नवीन जोशी कॉलनीतील अनेकांच्या डोळ्यांना अश्रू आल्यावाचून राहिले नाहीत. डोंगर कोसळल्यागत मराबाई सुन्न झाल्या. त्यांना काहीच सूचत नव्हते. रडूही येत नव्हते. त्याची आजी, भाचा आणि बहिणीने एकच आक्रोश केला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा...नकळतस्पर्श आणि अनर्थ घडला