आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death News In Marati, Young Man Death In Well At Aurangabad

हिमायतबागेच्या विहिरीत बुडून तरुणाचा अंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तीन अल्पवयीन मुलांसह पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास हिमायतबागेतील शक्कर विहिरीत बुडून अंत झाला. गणेश बालकिसन अंतराय (26, रा. तेलंगवाडा, जिन्सी) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी गणेश लहान मुलांसह हिमायतबागेतील शक्कर विहिरीवर मासे पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान, काही मुले विहिरीनजीकच्या पडक्या भिंतीवरून विहिरीत उड्या मारत होती. त्याच्यासोबतची मुले विहिरीच्या काठावर बसून मासे पकडत होती. मुले पोहत असल्याचे पाहून गणेशला पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यानेही विहिरीत उडी घेतली. त्याला पोहता येत नसल्याने आरडाओरड केली. हा प्रकार पाहून त्याच्यासोबतची मुले घाबरून गेली आणि त्यांनी घराकडे धूम ठोकली. काही नागरिकांनी ही माहिती अग्निशमन दलाला कळवली. अग्निशमन दलाने अवघ्या पाचच मिनिटांत गणेशचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. बेगमपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश हा फुटाणे तयार करून विक्री करायचा. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.