आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death Of Family Third Day Tribute Bye Blood Donation

निधनाच्या तिसऱ्या दविशी कुटुंबाची रक्तदानातून आदरांजली, दोन तासांत २१ जणांचे रक्तदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - घरातीलएखाद्या सदस्याचे निधन झाल्यानंतर पहिले तीन दविस आत्यंतिक दु:खाचे असतात. सांत्वन करायला येणाऱ्या मित्र, नातेवाइकांची रीघ लागलेली असते. अशा परिस्थितीत दु:खावेग आवरून सावडण्याच्या दविशी २१ जणांनी रक्तदान करून सामाजिक जाणीव जपण्याचा नवा आदर्श येथील बियाणी कुटुंबाने रचला.

शहरातील व्यापारी रामगोपाल बियाणी यांच्या पत्नी गोरजाबाई बियाणी यांचे २१ जुलै रोजी निधन झाले. २३ जुलै रोजी सावडण्याचा दविस होता. कैलास बियाणी यांच्या संकल्पनेतून या दविशी समाजाभिमुख उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील सदस्यांनी कुठलाही संकोच बाळगता प्रतिसाद दिला. गुरुवारी केदारनाथ बियाणी यांच्या नविासस्थानी शिबिराचे आयाेजन केले. परविारातील सदस्य आप्तेष्ट अशा २१ जणांनी रक्तदान करून गोरजाबाई बियाणी यांना आदरांजली अर्पण केली. यात विष्णुदास बियाणी, कैलास बियाणी, सुनीता बियाणी, शारदा खंडेलवाल, रामप्रसाद चरखा, विनीत चेचाणी, डाॅ. रमण बियाणी, अशोक सिकची, ओमप्रकाश मुंदडा, कोमल लोहिया, लक्ष्मीकांत बियाणी, वैभव बियाणी, जगदीश जाजू, प्रवीण बियाणी, विष्णूप्रसाद सिकची आदी पुतणे, भाचे नात्यातील सदस्यांचा सहभाग होता. शिबिराच्या यशस्वितेसाठी भगीरथ बियाणी, रामप्रसाद बियाणी, हनुमान बियाणी, श्रीकिसन बियाणी, रामबिलास बियाणी, बालकिसन बियाणी, जयू बियाणी यांनी परिश्रम घेतले. रक्त संकलनात जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी विभागाचे आर. एस. खेडकर, भुजंग भोसले, संतोष राऊत, महादेव शिंदे आदींचा सहभाग होता. सुख असो वा दु:ख रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. यातून अनेकांचे प्राण वाचतात. हीच धडपड मनाशी बांधत राबवलेल्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

बांधिलकी जपली
बियाणीकुटुंबातील एका सदस्याचे मागील वर्षी निधन झाले होते. त्यावेळीही सावडणे सुरू असताना कुटुंबातील सदस्यांनी अमरधाम स्मशानभूमी परिसर स्वच्छ केला होता. तर रक्तदान करून काकींना श्रद्धासुमन अर्पित केले.

निर्णयाचा दोन तासांत अमल
राजस्थानीसमाजात निधनाच्या तिसऱ्या दविशी उठावणा असताे. या दविशी पारंपरिक रीतीरविाजानुसार विधी होत असतानाच रक्तदानाची संकल्पना पुढे आली. दुपारी दाेन वाजता निर्णय झाला. साडेचार वाजता शिबिर पार पडले.

रक्तपेढीला सहकार्य
शहरातीलजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे सामाजिक संस्था रक्तदानासाठी पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत सदस्याच्या निधनानंतर सावडण्याच्या दविशी रक्तदानाचा विधायक उपक्रम बियाणी परविाराने राबवला. नात्यातील व्यक्तीचे दु:ख असते तरीही सामाजिक नाते या कुटुंबाने आणखी दृढ केले.'