आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसरूल तलावात बुडून पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याचा अंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मित्रांसोबत हसरूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शेख जावेद शेख तय्यब (19) याचा सोमवारी दुपारी 4 वाजता बुडून मृत्यू झाला. तो एमजीएमच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होता.
शेख जावेद हा मूळ मुंबई येथील भांडूपचा रहिवासी होता व सध्या चिश्तिया कॉलनीतील होस्टेलमध्ये राहत होता. त्याच्या वडिलांचा कांदा-बटाटा विक्रीचा व्यवसाय असून तो एकुलता एक मुलगा होता. त्याला तीन बहिणी आहेत.
त्याचे काका शहरातील रोशन गेट येथे हॉटेल चालवतात. सोमवारी दुपारी तो जटवाडा रोडवर राहणार्‍या मित्राकडे पुस्तक आणण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो इतर मित्रांसह पोहण्यासाठी गेला. तलावाच्या आत खोल पाण्यात गेल्यावर तो गटांगळ्या खात होता. बेगमपुरा पोलिसांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल दुपारी 4.30 वाजता घटनास्थळावर पोहोचले व अध्र्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर शेख जावेदचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शेख जावेदच्या मृत्यूची माहिती त्याच्या आई-वडिलांना देण्यात आली. शेख जावेद शिकत असतानाच अर्धवेळ कामही करत होता. बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.