आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूने पुन्हा एकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वाइनफ्लूने डोके वर काढले असून रावेर (जि. जळगाव) येथील एका रुग्णाचा धूत रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गणेश पाटील (५१) यांना १६ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २२ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बीड येथील आणखी एकाचा रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एन. गायकवाड यांनी सांगितले. ऑगस्ट महिन्यापासून शहरात स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्यांची संख्या झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरवासीयांनी काळजी घ्यावी. गणेशोत्सवानिमित्त देखावे पाहण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. शक्यतो रुमाल बांधून बाहेर पडावे, हस्तांदोलन करणे टाळणे आवश्यक आहे. याशिवाय गर्भवती, मधुमेही, अति जोखमीचे आजार असलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर करत आहेत.