आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानातील वाघाचा मृत्‍यू, आता उरले केवळ पाचच वाघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येथील मध्‍यवर्ती बसस्‍थानकाजवळ असलेल्‍या सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयात आज (मंगळवार) सकाळी एका 20 वर्षांच्‍या वाघाचा मृत्‍यू झाला. ‘गुड्डू‘ असे त्‍याचे नाव असून, तो रॉयल बेंगॉल टायगर प्रजातीचा होता.
नेमके काय झाले...
- सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान उद्यानातील कर्मचारी वाघाच्या पिंजऱ्याची स्वच्छता करण्यासाठी गेला होता.
- पिंजऱ्यातील शिल्लक राहिलेल्या खाद्य पदार्थाची साफसफाई केल्यानंतर काही वेळाने पिंजऱ्यात डोकावले.
- गुड्डू वाघ कोणतीही हालचाल करत नसल्याचे त्याच्या लक्षात आले.
- त्यामुळे त्याने त्‍याच्‍या अंगावर पाणी ओतले.
- मात्र, तरीही कोणतीही हालचाल न केल्याने कर्मचाऱ्याने वरिष्‍ठांना माहिती दिली.
- त्यांनतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला पाचारण करण्यात आले.
- वैद्यकीय तपासणीत वाघाचा मृत्यू झाल्याचे निष्पण्ण झाले.
- त्‍याचा मृत्‍यू नेमका कशामुळे झाला, याची चौकशी सुरू असून, शवविच्‍छेदन केले जाणार आहे.
उद्यानात आता पाचच वाघ
महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील नकुल आणि दुर्गा या दोन पिवळ्या वाघांची शनिवारी मध्य प्रदेशातील मुकुंदपूर प्राणिसंग्रहालय तथा झुआलॉजिकल पार्क रेस्क्यू सेंटरमध्ये रवानगी झाली आहे. ही जोडी गेल्याने सिद्धार्थ उद्यानात सहा वाघ शिल्लक होते. परंतु, या सहापैकी एका वाघाचा मृत्‍यू झाल्‍याने आता केवळ पाचच वाघ शिल्‍लक राहिले आहेत.