आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुसंगतीमुळे तरुणाचा मृत्यू, चोर समजून जमावाने केली मारहाण; कुटुंब झाले पोरके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाईटसवईच्या मित्रांची संगत लागल्यामुळे एका तरुणाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही तरुणांना जमावाने मारहाण केली. त्यावेळी हा तरुण त्या ठिकाणी उपस्थित होता. जमावाने त्यालादेखील मारहाण केली. घाटीत उपचारादरम्यान चौथ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. विजय पांडुरंग सदाफुले ३६, रा. छोटा मुरलीधरनगर असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आठ अज्ञात लोकांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा मजुरी काम करत होता. त्याला पत्नी, तीन मुली एक मुलगा आहे. १० जुलै रोजी दुपारी तीन वाजता विनोद बत्तासे, अनिल प्रभाकर गायकवाड विजय सदाफुले हे प्रशांतनगरातील केटरिंगच्या गोडाऊनमध्ये घुसल्याचे वॉचमनने पाहिले. त्याने आरडाओरड केल्याने मोठा जमाव जमला होता. जमावाला पाहून पळून जात असताना अनिल विजय हे दोघे जमावाच्या हाती लागले होते, तर विनोद पसार झाला होता. त्याने दूर जाऊन जमावावर दगडफेकदेखील केली. सापडलेल्या दोघांना जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विजय अनिल हे दोघे गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत जमावाने त्यांना उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नेले. त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी उपचारासाठी घाटीत दाखल केले. अनिलला जास्त मार नसल्याने डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज केले. मात्र विजयच्या डोक्याला गंभीर जखम असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान त्याचा गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
 
वाईटसंगतीचा परिणाम: पोलिसांच्या मते, विजयला दारूची सवय होती. चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इतर तरुणांसोबत त्याने मद्यसेवन केल्यानंतर अजून दारू पिण्यासाठी काहीतरी भुरटी चोरी करावी म्हणून हे तरुण संदीप प्रकाश जोशी यांच्या प्रतापनगर येथील केटरिंगच्या गोडाऊनमध्ये शिरले. मात्र यात विजयचा सहभाग नव्हता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकाने हा प्रकार पाहून आरडाओरड केल्यामुळे जमाव जमला आणि चोरांना मारहाण झाली.
 
शवविच्छेदन विभागात नातेवाइकांची गर्दी
गुरुवारीमध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास विजयचा मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी नातेवाइकांनी पोस्टमार्टम विभागात गर्दी केली. सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र गायकवाड, पोलिस निरीक्षक सतीश टाक, उपनिरीक्षक कल्याण शेळके, चव्हाण यांच्यासह उस्मानपुरा पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी या वेळी उपस्थित होते. या भागातील स्थानिक नेत्यांनीदेखील पोलिसांची भेट घेतली. विजयच्या बाबतीत पोलिसांकडे कुठलेही रेकॉर्ड नाही. त्याला जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात आणले होते. पोलिसांनीच त्याला घाटीत दाखल केले.
बातम्या आणखी आहेत...