आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या धडकेत जखमी तरुणाचा घाटीत मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: बुधवारी रात्री रेल्वेच्या धडकेत गंभीर रीत्या जखमी झालेल्या चोवीसवर्षीय तरुणाचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रियेश राजेंद्र चौधरी (२४, रा. राजाबाजार) असे मृताचे नाव आहे. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवण्यात अपयश आले. 

सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये प्रियेश कला वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. बीड बायपास येथील दुचाकीच्या शोरूममध्ये नोकरी करून तो शिक्षण घेत होता. बुधवारी रात्री आठच्या सुमारास तो संग्रामनगर उड्डाणपुलाखालील रेल्वे रूळ ओलांडत होता. त्याचेवळी जालन्याकडे डेमू रेल्वेगाडी जात होती.
 
या गाडीचा त्याला अंदाज आला नाही. यात त्याला गाडीचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला होता. प्रियेश याच्या पश्चात मोठा भाऊ, आई वडील असा परिवार आहे. 
बातम्या आणखी आहेत...