आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचा पाऊस मान्सून नव्हता; स्कायमेट’च्या प्रश्नाने हवामान खाते, तज्ज्ञांत उठले वादंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केरळात ८ जूनला मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले. ‘स्कायमेट’या खासगी हवामान अभ्यासक संस्थेने मात्र केरळात मान्सून २८ ते ३० मे दरम्यान येईल, असे भाकीत केले होते. त्यानुसार आठवडाभरापूर्वीच मान्सून केरळात दाखल झाल्याचे ‘स्कायमेट’चे मत आहे. ‘आमचा पाऊस मान्सूनचा नव्हता, तर तुमचा तरी कसा?’ असा सवाल ‘स्कायमेट’चे सीईओ जतिन सिंह यांनी केल्याने हवामान खाते, तज्ज्ञांत वादळ निर्माण झाले आहे. हवामान खात्याने जाहीर केलेला मान्सूनही अनेक निकष पूर्ण करत नसल्याकडे सिंह व स्कायमेटने लक्ष वेधले आहे.

देशातील मान्सूनबाबत सर्वत्र उत्सुकता असताना ‘स्कायमेट’ने यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्याचे भाकीत दोन महिन्यांपूर्वीच केले होते. स्कायमेटच्या अंदाजात अंदमानात मान्सून १८ ते २० मेदरम्यान तर केरळात २८ ते ३० मेदरम्यान दाखल होईल असे म्हटले होते. त्यानुसार मान्सून १८ मे रोजी अंदमानात दाखल झाला. ‘स्कायमेट’च्या मते, केरळातही मान्सून २८ ते ३० मेदरम्यानच दाखल झाला आहे. त्यासाठी या संस्थेने वेळोवेळी निकषांशी संबंधित आकडेवारीही दिली. मात्र, हवामान खात्याने केरळात त्या वेळी मान्सून अालेला नसल्याचे जाहीर केले. अखेर अाठ जून रोजी हवामान खात्याने केरळात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले. त्यावरून स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह यांनी विशेष भाष्य केले आहे.

पुढे वाचा...
> स्कायमेटचे अाक्षेप
>जी फॉर गव्हर्नमेंट, जी फॉर गॉड..!
>मराठवाड्यात पाच दिवसांनी मान्सून
बातम्या आणखी आहेत...