आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याचा २२५ कोटींचा नियोजन आराखडा तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्ह्याच्या प्रशासकीय ३३ विभागांना वर्ष २०१५-१६ साठी २२४ कोटी ३९ लाख रुपये खर्च करण्याचा आराखडा बुधवारी नियोजन समितीच्या लघुगटात तयार करण्यात आला. सर्व विभागांच्या प्रमुखांनी यात आपापल्या विभागांचा मागील वर्षाचा झालेला खर्च येणा-या वर्षाची मागणी यासंदर्भात मते मांडली.
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, खासदार ए.टी.पाटील यांच्या उपस्थितीत ही लघुगट बैठक झाली. लघुगटाने तयार केलेला आराखडा डीपीडीसी आणि तेथून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या खर्चात कपात करून जागेवरच दिलेल्या खर्चाची माहिती देण्यात आली आहे. यात पुढील पातळीवर बदल होणे शक्य असते. पुढील वर्षाच्या खर्चाचा आराखडा सांगत असतानाच गेल्या वर्षी दिलेल्या पैशांचा विनियोग कसा झाला? याबाबतही आढावा या वेळी घेण्यात आला. ज्या विभागांचे गेल्या वर्षी मिळालेले पैसे खर्च झाले नाहीत, त्यांच्या पुढील वर्षाच्या आराखड्यात कपात करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रशासकीय मान्यतेअभावी अनेक विकासकामे रखडली होती, त्यामुळे आता शिल्लक राहिलेल्या दोन महिन्यांत ही कामे मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी केल्या आहेत.