आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतीच्या वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या घटली, मात्र खिल्लारीची क्रेझ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेतीचे वाढते यांत्रिकीकरण आणि अस्मानी संकटामुळे मागील तीन वर्षांत राज्यातील बैलांची संख्या ३ टक्क्यांनी घटली आहे. असे असले तरी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील बळीराजामध्ये खिल्लारी जोडीची क्रेझ अद्यापही कायम आहे. २०१२ च्या पंचवार्षिक गणनेच्या तुलनेत यंदा बैलांच्या संख्येत तीन लाखांपेक्षा अधिक घट आढळली आहे.
सध्या राज्यात ७२ लाख २३ हजार ३०० बैल आहेत. नाशिकमध्ये सर्वाधिक ४७ हजार बैल आहे.
संगोपन जिकिरीचे
यांत्रिकीकरण, वैरण व पाणीटंचाई यामुळे बैलांचे संगाेपन करणे जिकिरीचे झाले आहे, असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले.
राज्यातील बैलांची संख्या
- देशी - ६७ लाख ७९ हजार ४४०
- संकरित - ०४ लाख ४३ हजार ८६०
- एकूण - ७२ लाख २३ हजार ३००
जिल्हानिहाय संख्या अशी
नाशिक : ४७ हजार, अहमदनगर : ४२ हजार, औरंगाबाद : ४० हजार, सोलापूर : ३३ हजार, पुणे : २५ हजार, वाशीम : ०२ हजार.