औरंगाबाद- सिद्धार्थ उद्यानात उभारण्यात येत असलेल्या हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे लोकार्पण फेब्रुवारीलाच होणार हे नक्की आहे.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित आयोजित हिंदू जनजागरण पंधरवड्याचा समारोप याच दिवशी होणार असून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हे संग्रहालय लोकांसाठी खुले होईल. संग्रहालयाचे काम तातडीने लोकार्पित व्हावेत यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू झाले होते. पालकमंत्री रामदास कदम यांनी यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार हे काम अंतिम टप्प्यात असून तारखेला ते लोकांसाठी खुले होईल, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.