आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी पुत्राच्या बासरीचे सूर परदेशात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दीपक भानुसे या तरुणाने जिद्दीच्या जोरावर कुटुंबात कुठलीच संगीताची परंपरा नसताना फक्त बासरीवादनासाठी आयुष्य वाहून घेतले. आज त्याच्या बासरीचे सूर सातासमुद्रापार पोहोचले आहेत.
शेतकरी अप्पासाहेब अन् त्यांची पत्नी आशा यांनी दहा वर्षांपूर्वी मुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबाद गाठले. तीन मुले अन् मुलींत दीपक मधला मुलगा. गावात भजनामुळे त्याच्यात संगीताची आवड निर्माण झाली. बासरीतवादनातच करिअर करण्याचा निर्णय त्याने घेतला अन् तो पंडित नाथराव नेरळकरांकडे संगीताचे धडे गिरवू लागला. स. भु. महाविद्यालयातून बीए (संगीत) झाल्यावर पुण्यात बासरी हाच विषय घेऊन एमए पूर्ण केले. प्रख्यात बासरीवादक पंडित केशव गेंडे यांच्याकडेही त्याने धडे घेतले.

संस्कृतचा अभ्यासक : पुणेशहरात दीपकला संस्कृत भाषेतही गोडी निर्माण झाली. त्याने संगीत विशारद, एमए बासरी आणि एमए संस्कृत या पदव्या प्राप्त केल्या.
पर्यटकांनादेतो माहिती : दीपकआता पुण्यात स्थायिक झाला आहे. तो एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संगीत शिक्षक म्हणून नोकरी करतो. तेथे विदेशी पर्यटकांसमोर बासरी वाजवून त्यांना या वाद्याचे महत्त्व सांगतो. पुण्यात त्याने फ्ल्यूट टेम्पल नावाची संस्था काढली आहे. या संस्थेच्या माध्यमातून तो बासरीसह संस्कृत अध्यापनाचे धडेही देशी जिज्ञासूंसह विदेशी पर्यटकांना देतो.

अाधी काळजी वाटली..!
^दीपकने बासरीवादनात करिअर केले. दिल्लीला जाऊन चाळीस हजारांची बासरी आणली तेव्हा काळजी वाटली. पण तो सिंगापूरला गेला तेव्हा मात्र अभिमान वाटला. -अप्पासाहेब भानुसे, वडील

मराठवाड्याचा वेणुनाद विदेशात
दीपकहा जगातील सर्वात लांब म्हणजे साडेतीन फूट लांब अन् बारा छिद्र असलेली बासरी वाजवतो. गुरू केशव गेंडे यांनी ही बासरी विकसित केली. त्याचे भारतासह सिंगापूर, मलेशिया अन् अमेरिकेतही कार्यक्रम होतात.
बातम्या आणखी आहेत...